आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संशयित गुन्हेगारांच्या समर्थकांना पाच हजारांचा दंड, टेहळणी बहाद्दरांना पाेलिसांचा दणका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गावठी कट्टा विकत घेणाऱ्या दोन संशयितांच्या ‘समर्थकां’विरोधात पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. पोलिस आयुक्तालयाने पहिल्यांदाच पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी करणाऱ्या समर्थकांवर धडाकेबाज कारवाई करीत गुन्हेगारांच्या समर्थकांची हवाच काढून टाकली. दहा संशयितांवर प्रतिबंधक कारवाई करून त्यांना न्यायालयात प्रत्येकी पाच हजार रुपये दंड करण्यात आला.

सरकारवाडा पोलिसांनी नाशिकरोड येथील मतेश जडघुले पवन आहिरे (रा. नाशिकरोड) यांना गावठी कट्टे विकत घेताना दोन दिवसांपूर्वी पी अँड टी कॉलनीत अटक केली होती. दोघांवर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिस ठाण्याच्या आवारात विनाकारण ‘टेहळणी’ करणाऱ्या १० संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात फिरण्याचे कारण विचारले असता समाधानकारक उत्तरे दिल्याने संशयितांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. यापुढे पोलिस ठाण्याच्या आवारात गैरउद्देशाने फिरत असल्यास त्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला.

पोलिस ठाणे आवारात फिरणारे रडारवर
पोलिस ठाण्यांच्या आवारात विनाकारण फिरणे, टेहळणी करणे अादी कारणास्तव संशयास्पद फिरणाऱ्या संशयितांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारांच्या समर्थकांसह ‘सेटलमेंट’ करणाऱ्या बहाद्दरांवर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...