आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीनेच केला पत्नीवर गोळीबार, मित्रासह पत्नीही झाली जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- वाढदिवसाच्या पार्टीनंतर घरगुती भांडणातून पतीनेच पत्नीवर गोळीबार केल्याचे पाथर्डी फाटा येथील घटनेत उघड झाले अाहे. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मित्रावरही गोळीबार करण्यात आला असून, दोघेही जखमी आहेत. यात सुदैवाने पत्नी मित्राचे प्राण वाचले आहेत. याप्रकरणी संशयित पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुरुवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पाथर्डी फाटा येथील साईराम रो-हाऊसमध्ये सोनू ऊर्फ दीपक अशोक परदेशी नागेश्वर बंगाली ठाकूर या दोन मित्रांची वाढदिवसानिमित्त पार्टी झाली. त्यानंतर दीपकचे त्याची पत्नी कोमलशी भांडण झाले त्याने तिच्यावर गोळी झाडली. मित्र नागेश्वरने वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता दीपकने त्याच्यावरही गोळी झाडली. त्याने चपळाईने वाचण्याचा प्रयत्न केल्याने गाेळी त्याच्या चेहऱ्याला चाटून गेली. कोमल नागेश्वरने जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. मात्र, प्रकार गंभीर असल्याचे लक्षात आल्याने शेजारी मदतीसाठी आले नाहीत. रक्तबंबाळ अवस्थेतच नागेश्वरने पळ काढला पाथर्डीकडे पळून एका पिकअप शेडमध्ये लपला.

हा प्रकार काही नागरिकांनी पोलिसांना कळविला. दीपकने स्वतःच पत्नीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच, तो रुग्णालयातील चौकीत माहिती देण्यासाठी गेला असता पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. घटना घडली, तेव्हा दीपकच्या घरात त्याचा लहान मुलगा, एक मुलगी एक काम करणारी मुलगी होती. मात्र, यात अन्य कुणी जखमी झाले नाही.

पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, वरिष्ठ निरीक्षक सदानंद इनामदार आदींनी घटनास्थळी तपासणी केली. त्यांना दोन गोळ्या सापडल्या. इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...