आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळी जादू चर्चेवरून काका-पुतणे ताब्यात, नाशिमधील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पंचवटीतील पाथरवट लेन येथे पडक्या वाड्याच्या ठिकाणी नवीन घर बांधण्यासाठी भूमिपूजन करणाऱ्या काका-पुतण्याला काळी जादू करीत असल्याच्या संशयावरून पाेलिसांनी चाैकशीसाठी ताब्यात घेतले हाेते.

घराचे काम करण्यासाठी काका-पुतण्याकडून भूमिपूजन चालू हाेते. मात्र, पाऊस येत असल्याने हा कार्यक्रम पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात येत असतानाच कुणीतरी पंचवटी पाेलिसांनी फाेन करून तेथे ‘काळी जादू’ करीत असल्याचे कळविले. पाेलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन काका- पुतण्यांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र रात्री उशिरापर्यंत काहीही निष्पन्न झाले नव्हते.
बातम्या आणखी आहेत...