आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वेगवेगळ्या घटनांत पोलिसांवर हल्ला, अंगावर रिक्षा घालत जिवे मारण्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातदोन वेगवेगळ्या घटनांत पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुंबई येथील हल्ल्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मृत्यूची घटना ताजी असताना पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर रिक्षा चालवत जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिस कर्मचारी असुरक्षित झाले आहेत. याप्रकरणी उपनगर, भद्रकाली पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहराच्या सुरक्षेची जबाबदारी पाप पाडणारे पोलिस कर्मचारीच असुरक्षित असल्याचे वाढत्या हल्ल्यातून निदर्शनास येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती आणि पोलिस कर्मचारी घोलप यांच्या फिर्यादीनुसार तपोवन चौफुली, गांधीनगर येथे सोमवारी (दि. ५) सायंकाळी वाजेच्या सुमारास चौफुलीवर नाकेबंदी कारवाई सुरू असताना संशयित रिक्षाला (एमएच १५ इएच १७४४) थांबवण्यासाठी हात देण्याचा प्रयत्न केला. संशयितांनी रिक्षा थेट घोलप यांच्या अंगावर चालवत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. संशयित रिक्षाचालक सागर शिवाजी नाईक, नितीन अशोक वाडकर, रोहित नाईक, रोहित हळदणकर, ज्ञानेश्वर वाघमारे यांच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत ट्रिपलसीट विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारास थांबवले असता तिघांनी पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसीर कर्मचारी भाऊसाहेब चत्तर हे काठे गल्ली सिग्नलवर कर्तव्य बजावत असताना काठे गल्ली सिग्नलकडून द्वारकाकडे विरुद्ध दिशेने ट्रिपलसीट जाणाऱ्या दुचाकीला अडवले. चालक आनंद अशोक तासबंड याने चत्तर यांना धक्काबुक्की केली. संशयिताच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितास जामिनावर मुक्त करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...