आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांडिया खेळण्याचा वादात एकावर प्राणघातक हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दांडिया खेळून आलेल्या तीन तरुणांना दांडिया खेळून झाला का, असे विचारणाऱ्या कारचालकावर टोळक्याने शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवर हा प्रकार घडला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर रोडवरील हनुमाननगर येथील एका मंडळातून दांडिया बघण्यास गेलेले शिवाजी प्रतापराव शेलार (४४, जेहान सर्कल, गंगापूररोड) यांनी परिसरात उभ्या असलेल्या तीन तरुणांना दांडिया खेळून आले का, असे विचारले. याचा राग आल्याने तरुणांनी शेलार यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने त्यांच्या पोटात सपासप वार करण्यात आले. शेलार यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील काही नागरिक मदतीस धावले. तोपर्यंत हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. शेलार यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.