आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालन्यायालयात गाेळीबार; संशयित पाेलिसांना शरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- एकुलताएक मुलाच्या खून प्रकरणातील संशयितावर बालन्यायालयात गाेळीबार करून पळ काढणाऱ्या संशयित प्रणील श्यामकांत बाविस्कर यांनी अखेर गुरुवारी (दि. १८) घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मुंबई नाका पाेलिस ठाण्यात हजर हाेऊन शरणागती पत्करली. पाेलिसांनी संशयितास अटक केली असून, त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार अाहे. बुधवारी भरदुपारी अल्पवयीन संशयितावर मुलाच्या विरहाने वैफल्यग्रस्त झालेल्या या पित्याने गाेळीबार केल्याची घटना घडली हाेती.

मालेगाव येथील रहिवासी प्रणील बाविस्कर यांचा मुलगा माेहितचे गेल्या वर्षी १४ अाॅक्टाेबरला अपहरण करून खून करण्यात अाला हाेता. माेहितच्या बालपणीच्या मित्रांनीच २० लाखांच्या खंडणीसाठी त्याचे अपहरण केल्याचे उघडकीस अाले हाेते. या प्रकरणी दाेघा मित्रांसह आकाश प्रभू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची बालन्यायालयाच्या अादेशाने बालसुधारगृहात रवानगी करण्यात अाली हाेती. या गुन्ह्याच्या नियमित सुनावणीसाठी उंटवाडी रोडवरील बालन्यायालयात तिघा संशयितांना हजर करण्यात अाले हाेते. त्यावेळी प्रणील बाविस्करही अाले हाेते. न्यायालयीन सुनावणीनंतर बाविस्कर यांना संशयितांना केवळ तीनच वर्षे शिक्षा हाेऊ शकते किंवा ते िनर्दाेषही सुटू शकतात, अशी माहिती मिळाली. त्यामुळे अाधीच वैफल्यग्रस्त असलेल्या बाविस्कर यांनी अचानक पिस्तूल काढून संशयिताच्या दिशेने गाेळीबार केला. मात्र, ताे वेळीच सावध झाल्याने त्याच्या खांद्याला गाेळी चाटून जात ताे बचावला.

फरार झालेल्या या गुन्ह्यात पाेलिस बाविस्कर यांचा शाेध घेत असतानाच गुरुवारी दुपारी वाजेच्या सुमारास ते स्वत:हून हजर झाल्याचे पाेलिसांनी सांगितले. वरिष्ठ निरीक्षक अानंद वाघ यांनी अटकेची प्रक्रिया पूर्ण केली.

पाेलिस ठाण्यातही केला अाक्राेश...
बाविस्करची पाेलिस ठाण्यात चाैकशी सुरू असतानाच माेहितच्या अाठवणींनी त्यास रडू काेसळले. ‘माेहितच्या खुनानंतर त्याच्या अाजाेबांचे धक्क्याने निधन झाले. त्याची अाईही सारखी अाजारी पडते. अाम्हाला काेणालाच त्याचा विरह सहन हाेत नसून, त्याने यांचं काय बिघडवलं हाेतं?’ असे ताे म्हणाल्याचे सांगण्यात अाले. त्या दिवसापासून प्रणील नातेवाईक, मित्रमंडळींत काेठेही गेलेला नसून, दाढीही केलेली नसल्याचे दिसून अाले.
बातम्या आणखी आहेत...