आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा महिन्यांत २१ पिस्तुले अाणि ५० प्राणघातक शस्त्रे हस्तगत, २७ सराईत गुन्हेगारांवर कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक शहरात वाढलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्तांनी सुरू केलेल्या विविध कारवाई अंतर्गत गुन्हे शाखेच्या तीन युनिटच्या पथकांनी शहर आणि परिसरात विविध कारवाईअंतर्गत तब्बल २१ पिस्तुले आणि जिवंत काडतुसे आणि ५० प्राणघातक शस्त्रे हस्तगत केले. पाच महिन्यांत गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत विविध गुन्ह्यांत २७ सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली.
नाशिक शहरात सिंहस्थानंतर गुन्हेगार सक्रिय झाल्याचे निदर्शनास येत आहे. टोळी युद्ध भडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. यासह घरफोडी, सोनसाखळी, वाहनचोरीसह इतर गुन्ह्यांमध्ये वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. अकरा पोलिस ठाण्याअंतर्गत सप्टेंबर २०१५ मध्ये घरफोडी, जबरी चोरी, दिवसा घरफोडी, रात्री घरफोडी आणि इतर चोऱ्यांमध्ये एक कोटी २६ लाख २९ हजारांचा माल चोरी करण्यात आला. यापैकी फक्त अवघा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. हे सर्व गुन्हे घडत असताना खून, प्राणघातक हल्ला, गोळीबाराच्या घटनांतही वाढ झाली होती. याकडे गुन्हे शाखेने लक्ष वेधत सराईत गुन्हेगारांवर पाळत ठेवत पाच महिन्यांत २१ पिस्तुलांसह जिवंत काडतूस आणि ५० प्राणघातक शस्त्रे हस्तगत करण्यात यश आले. तरीदेखील काही ठिकाणी हवेत गोळीबार करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पाच महिन्यांत गुन्हे शाखेने तपास करत २० चारचाकी वाहन, ४५ दुचाकी आणि तीन खुनाचे गुन्हे उघडकीस आणले. पोलिस उपआयुक्त अविनाश बारगळ, सहायक आयुक्त सचिन गोरे, युनिट १, च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अवघ्या पाच महिन्यांत ही कारवाई केली. दिवाळीमध्ये गुन्हे नियंत्रणात ठेवण्यासाठी गुन्हे शाखेकडून गस्त सुरू असल्याचे सहायक आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले.
अशी झाली कारवाई...
२१पिस्तुले, ५० प्राणघातक हत्यारे, २० कार, ४५ दुचाकी आणि तीन खुनाचे गुन्हे उघडकीस आले.
विशेषनियोजन...

दिवाळीमध्येघरफोडीचे गुन्हे घडण्याचे प्रकार वाढतात. या घटना रोखण्यासाठी गुन्हे शाखेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. सचिनगोरे, सहायक आयुक्त, गुन्हे शाखा
बातम्या आणखी आहेत...