आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुहेरी खून प्रकरणः तीन महिने उलटूनही दाेघे फरारच, लोंढेसह सात जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सातपूरच्या दाेघा सराईत गुन्हेगारांच्या खून प्रकरणात ग्रामीण पाेलिसांनी अखेर फरार संशयित भूषण लाेंढेसह सात संशयितांविरुद्ध सुमारे ३०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले अाहे. विशेष म्हणजे, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला मुख्य संशयित पीएल ग्रुपचा अध्यक्ष तथा नगरसेवकपुत्र भूषणच्या शाेधार्थ तब्बल तीन महिन्यांपासून पाेलिस पथके देशभरात फिरत असली तरी ताे हाती लागत नसल्याने पाेलिसांच्या भूमिकेविषयी संशय निर्माण होत अाहे.

निखिल गवळे अर्जुन अाव्हाड या सराईत गुन्हेगारांच्या हत्याकांडाप्रकरणी त्र्यंबकेश्वर पाेलिसांनी जानेवारी राेजी गुन्हा दाखल केला हाेता. सुरुवातीला स्थानिक गुन्हाशाेध पथकाने संशयित प्रिन्स सिंग, निखिल निकुंभ, ललित विठ्ठलकर, वतन पवार आणि किशोर गायकवाड यांना अटक केली होती. त्यापाठाेपाठ भूषण लोंढे, संदीप गांगुर्डे यांचा सहभाग निश्चित झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मात्र, उच्च न्यायालयाच्या दाेन दिवसांच्या तात्पुरत्या जामिनामुळे लाेंढेंनी शाही विवाह पार पाडला. त्या दिवसापासून ते अाजवर दाेघेही पाेलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरत अाहेत. दरम्यान, उत्सव जयंती महाेत्सवासाठी भूषण शहरात येण्याची शक्यता असून, त्या दिशेने नजर ठेवली जात अाहे.

तांत्रिक विश्लेषण शाखेचे अपयश
गेल्या अाठवड्यातच भूषणचा वाढदिवस माेठ्या स्वरूपात साजरा झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले. तरी ग्रामीण पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषण शाखेला त्याचा थांगपत्ताच नव्हता. उपअधीक्षक डाॅ. मुंढे यांनी चक्रे फिरवून अाठवडाभराच्या अात पाचही संशयित जेरबंद केले. मात्र, त्यानंतरही मुख्य संशयितांच्या शाेधात तपास पथकांना यश येत नसल्याने यंत्रणेच्या भूमिकेविषयीच संशय निर्माण हाेत अाहे.