आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सेंट फ्रान्सिस’मध्ये दुसरीच्या विद्यार्थ्यास शिक्षिकेची मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शालेय फी भरल्याने दुसरीच्या विद्यार्थ्यास वर्गशिक्षिकेने मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी ३.३० वाजता सेंट फ्रान्सिस शाळेत घडला. या प्रकरणी वर्गशिक्षिकेच्या विरोधात पालकाच्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेंट फ्रान्सिस शाळेतील इयत्ता दुसरीतील विद्यार्थी अभय दहिजे याने फी भरल्याने वर्गशिक्षिका सीमा (पूर्ण नाव नाही) यांनी मुलास मारहाण केल्याची तक्रार पालक रागिणी दहिजे यांनी सरकारवाडा पोलिसांत दिली. पोलिस ठाण्यात पंधरा ते वीस पालक आणि विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पालकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने अखेर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सेंट फ्रान्सिस शाळेने नियमबाह्य फीवाढ केली आहे. याविरोधात काही दिवसांपूर्वी पालक आणि शिक्षण बाजारीकरण मंचाने आंदोलन केले होते. पालक आणि शाळा व्यवस्थापन दोघांकडून मनमानी होत असल्याने यामध्ये फक्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची चर्चा आता पालकांमध्ये सुरू अाहे.
बातम्या आणखी आहेत...