आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातपूरला वैफल्यग्रस्ताकडून सात दुचाकींचे नुकसान,संशयित ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर- सातपूरला काॅलनी परिसरात ११ वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याच्या प्रकाराचा तपास सुरू असतानाच, शनिवारी पहाटे सात दुचाकींचे सीट कव्हर धारदार शस्त्राच्या सहाय्याने फाडण्यात अाले. नगरसेवक प्रकाश लाेंढे यांच्या प्रभागात हा प्रकार घडल्याने पाेलिस यंत्रणा खडबडून जागी झाली खरी, मात्र हा प्रकार एका वैफल्यग्रस्त युवकाने केल्याचे समजल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास साेडला. दरम्यान, साेशल मीडियाद्वारे ही घटना सर्वत्र पसरल्याने पाेलिसांची धावपळ उडाली.

सातपूर काॅलनी परिसरात मंगळवारी मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी ११ वाहनांच्या काचा फाेडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या घटनेला तीन दिवस उलटूनही यातील अाराेपींचा शाेध लागला नसतानाच शनिवारी पहाटे पुन्हा वाहनांचे नुकसान झाल्याच्या वृत्ताने पाेलिसांची झाेपच उडाली. सहायक अायुक्त अतुल झेंडे, सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक मनाेज करंजे यांनी सहकाऱ्यांसह तातडीने स्वारबाबानगर परिसरात धाव घेऊन तपासचक्रे फिरविताच नीलेश शार्दूल या युवकाने वैफल्यग्रस्त स्थितीत हे कृत्य केल्याचे समाेर अाले. पाेलिसांनी युवकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला अाहे.

या वाहनांचे झाले नुकसान
एमएच१५ डीई २३४७ डिस्कव्हर
एमएच १५ सीएल ६३१२ हिराे हाेंडा
एमएच १५ सीव्ही २९६५ हिराे हाेंडा
एमएच १५ ईवाय ०६६१ डिस्कव्हर
एमएच १५ एएल ५२७७ स्कूटी
एमएच १५ ईअार ६३७६ अॅक्टिव्हा
एमएच १५ एव्ही ८५८८ हिराे हाेंडा पॅशन
बातम्या आणखी आहेत...