आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाेलिसांच्या गस्तीमुळे टळली लूट, सातपूरच्या व्यावसायिकाला केले होते लक्ष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शालिमार चाैकात नाशिकराेड रेल्वे स्टेशनकडे निघालेल्या व्यापाऱ्याला रिक्षाचालकाच्या संगनमताने लुटण्याचा प्रयत्न गस्तीवरील पाेलिसांमुळे असफल ठरला. पाेलिसांनी पाठलाग करून एका रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले.

सातपूर येथील व्यावसायिक संजय घाेणे मासे अाणण्यासाठी गुरुवारी (दि. १८) मध्यरात्री मुंबईस निघाले हाेते. शालिमार येथे एकटेच उभे असताना हाती दंडुका घेतलेल्या एका युवकाने त्यांना दमदाटी करून खिशातील पैसे काढण्यास सांगितले. घाेणे यांनी नकार देताच त्याने दंडुक्याने मारण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात गस्तीवरील भद्रकाली पाेलिस ठाण्याचे वाहन तेथे अाले. पाेलिस वाहन पाहून व्यावसायिकाने अारडाअाेरड करताच संशयिताने पळ काढला. मात्र, सहाय्यक पाेलिस निरीक्षक माेहिनी लाेखंडे, हवालदार यादव वाघ पाेलिस काॅन्स्टेबल उत्तम पाटील यांच्या पथकाने त्याला पकडले.

दरम्यान, घाेणे दुसऱ्या रिक्षाने निघताच लुटारूच्या साथीदार रिक्षाचालकाने ती रिक्षा अडवत त्यांना खाली उतरवले. पाेलिस वाहन लुटारूला नेत असताना व्यावसायिकाने पुन्हा अारडाअाेरड करून पाेलिसांचे लक्ष वेधले. पाेलिसांनी दाेन्ही संशयितांना पाेलिस ठाण्यात नेले.

शालिमार चौकात लुटीच्या घटना नेहमीच्याच
शालिमार चाैकात रात्रीच्या वेळी नेहमीच लुटीच्या घटना नवीन नाहीत. या भागात नियमित गस्त असली, तरी काही रिक्षाचालक रात्री फक्त गुन्हे करण्यासाठीच रिक्षा चालवतात. त्यांच्याकडे प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमाप्रमाणे बॅच गणवेश नसताे. त्यामुळे ते रिक्षाचालक अाहेत की गुंड, याचा उलगडा प्रवाशांना हाेत नाही. याचाच फायदा घेत प्रवाशांची लूट केली जाते.
बातम्या आणखी आहेत...