आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Crime Registered Against Party Orgniser At Nashik Airport

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमानतळावरील पार्टीप्रकरणी आयोजकांविरुद्ध गुन्हे दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिंडोरी - दिंडोरीतालुक्यातील जानोरीनजीक असलेल्या नाशिक विमानतळावर झालेल्या साग्रसंगीत पार्टीचे आयोजक ठेकेदार, हर्ष कन्स्ट्रक्शनचे संचालक विलास बिरारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, ऑर्केस्ट्राचे मालक सुनील ढगे, डिंगोरे डेकोरेटर्सचे व्यवस्थापक हरिश्चंद्र विक्रम पाटील यांच्याविरोधात मंगळवारी दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यातील ढगे आणि पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड, रात्री उशिरापर्यंत विनापरवाना वाद्य वाजवूनशांततेचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, या पार्टीप्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्यातील तीन वरिष्ठ अधिका-यांवर थेट निलंबनाचीच कारवाई होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. जिल्हाधिका-यांनीही याप्रकरणी संबंधितांवर कारवाईचा अहवाल मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना येत्या २-३ दिवसांत सादर करणार असल्याचे सांगितले आहे. बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शनिवारी रात्री या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. जानोरीच्या ग्रामस्थांनी याबाबत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करून या प्रकरणाच्या चौकशीची कारवाईची मागणी केली. खासदार चव्हाण यांनी त्यानंतर तेथे प्रत्यक्ष भेट देत पाहणी करून चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार, पंचनामा नंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई झाली. दरम्यान, शासकीय जागेत एका दिवसासाठी मद्य परवाना द्यावा किंवा नाही, याबाबत काहीही निर्देश उत्पादन शुल्क विभागास नसल्याचे प्रभारी निरीक्षक एस. एस. देशमुख यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बी. आर. गनकवार या प्रकरणी तपास करीत आहेत.
नाशिक विमानतळावरील पार्टीच्या प्रकरणाचे शहरात तीव्र पडसाद उमटले असून, आयटीआय सिग्नल परिसरात त्यासंदर्भात प्रदीप पेशकार यांनी लावलेला हा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

युवासेनेकडून गांधीगिरी
संरक्षणक्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या आेझर विमानतळावर साग्रसंगीत पार्टीची परवानगी माफक शुल्कात दिली जात असेल, तर याच शुल्कात सध्या विनावापर पडून असलेले विमानतळ गरीब शेतक-यांना लग्नसराईसाठी तरी उपलब्ध करून द्या, असा टाेला शिवसेनेच्या युवा सेनेने गांधीगिरी स्टाइल आंदाेलन करून लगावला. यासंदर्भात जिल्हाधिकारी विलास पाटील यांना पदाधिका-यांनी निवेदनही दिले.

आेझर विमानतळावर परवानगीशिवाय चिटपाखरालाही प्रवेश मिळत नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने दहा हजार रुपये शुल्क आकारून पार्टीसाठी परवानगी दिली. एका बड्या अधिका-याच्या सेवानिवृत्ती सोहळ्यासाठी जर अशी महत्त्वाची जागा सभागृह सहज दिली जात असेल, तर ताेच न्याय गरीब शेतक-यांनाही द्यावा, अशी मागणी युवा सेनेने निवेदनात केली आहे. या परिसरात लग्न कार्यालय वा सामाजिक सभागृह नाही. त्यामुळे पडून असलेले विमानतळ लग्न अन्य कार्यक्रमासाठी दिले तर महसुलाचा हव्यास असलेल्या प्रशासनाला आधार होईल, असाही उपहासात्मक टोला लगावण्यात आला आहे. विमानतळाचे नाव बदलून सामाजिक सभागृह असे ठेवावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. या वेळी आदित्य बोरस्ते, योगेश बेलदार, गणेश बर्वे, संदीप गायकर, वैभव ठाकरे, ललित वाघ आदी उपस्थित होते.
याप्रकरणी पोलिस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बी. आर. गनकवार या प्रकरणी तपास करीत आहेत.