आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून प्रकरणाचा चाेवीस तासांत छडा- गुन्हे शाखेची कारवाई, तीन संशयितांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वैभव परदेशी या युवकाच्या खूनप्रकरणी तीन संशयितांना अटक केली. जिवे मारण्याच्या भीतीने संशयितांनी हा खून केल्याचे तपासात उघडकीस आले. कुठलेही धागेदोरे नसताना चोवीस तासांत स्थानिक गुन्हे शाखेने हा गुन्हा उघडकीस आणला संशयितांना बेड्या ठोकल्या.

जव्हाररोडवर तोरंगण घाटात आंबा डोंगराच्या पायथ्याशी वैभव ऊर्फ पिन्या किसनसिंग परदेशी (२२, रा. अशोकस्तंभ, गोदावरीवाडी) या युवकाचा शस्त्राने गळा चिरलेला मृतदेह सोमवारी सकाळी अाढळला हाेता. घटनास्थळी मिळालेल्या वस्तू आणि मोबाइल क्रमांकावरून पथकाने रात्रीच तपासाची सूत्रे फिरवत बाबू ऊर्फ हेमंत सुधाकर बोटे, गणेश नरेश वर्मा सनी ऊर्फ कल्पेश सतीश रामराजे या संशयितांना तारवालानगर परिसरात एस्टिम कारने (एमएच ०६, ३२४३) पळून जात असतानापाठलाग करून अटक केली. चौकशीमध्ये वैभव परदेशी हा वारंवार मद्यासाठी पैशांची मागणी करत होता. रविवारी रात्री मद्य प्राशन करत असताना हातात कोयता घेऊन मद्य पिण्यासाठी त्याने पैसे मागितले. पैसे दिले नाही तर जिवे मारण्याची धमकी त्याने दिली. परदेशी याची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघता भीतीपोटी संशयितांनी वैभवला भरपूर मद्य पाजले कारमधून त्र्यंबकेश्वर मार्गे जव्हाररोडवरील तोरंगण घाटात ते घेऊन गेले. येथे गळा चिरून त्याची हत्या केल्याची कबुली संशयितांनी दिली. वरिष्ठ निरीक्षक किशोर नवले, जगदीश गिरी, उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, बालाजी मुसळे, रवींद्र शिलावट, रवी वानखेडे अादींच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आली. संशयितांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.

टायर पंक्चर झाल्याने संशयित जेरबंद
संशयित खूनकरून तारवालानगरमार्गे धुळ्याला पळून जाणार होते. मात्र, वाहनाचे टायर पंक्चर झाल्याने ते महामार्गावर थांबले. संशयित वाहन अाढळल्याने संशयितांना जेरबंद करण्यास यश आले. - किशोर नवले, वरिष्ठनिरीक्षक
बातम्या आणखी आहेत...