आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार सोनसाखळी चोरांना काही तासांत अटक; आडगाव पोलिसांची कामगिरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी- चार सोनसाखळी चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. चार ठिकाणी सोनसाखळी चोरी झाली होती. आडगाव-भद्रकाली पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली.

शनिवारी प्रेरणा सोले (रा. आनंदनगर), सुवर्णा पाटील (रा. अशोकबन कॉलनी), गायत्री माळोदे व उषा कट्यारे यांची सोनसाखळी चोरट्यांनी पळविली. या महिलानी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी वायरलेस यंत्रणेवरून सर्वत्र संदेश दिला. भद्रकाली पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक बाजीराव भोसले, चंद्रकांत बारवकर द्वारका परिसरात गस्त घालत असताना त्यांना हा संदेश मिळाल्याने त्यांनी काळ्या पल्सरवरून वेगाने जाणार्‍या दोन संशयितांचा पाठलाग करून त्यांना तपोवनरोडवर दोघांना पकडले. मज्जू ऊर्फ मद्दुस्सर हमिद अन्सारी आणि ताजउद्दीन शेख अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून काळी प्लसर (एम.एच. 15 बीए. 9416) तसेच दोन मंगळसूत्र ताब्यात घेण्यात आली. चौकशीत त्यांनी छोटू ऊर्फ साहिद मोहम्मद , मोसेब अन्सार सय्यद या दोन साथीदारांनी दुचाकीवरून (एमएच 15 बीए. 3249) सोनसाखळ्या चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान, या दोघांना नानावली येथे अटक करण्यात आली.