आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्हेगार नगरसेवकाची महासभेत प्रथमच पाेलिस बंदाेबस्तात ‘हजेरी’, 2 तासांसाठी कारागृहातून सुटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पंचवटीतील ज्वाल्या खून प्रकरणात अन्य सराईत गुन्हेगारांसह नाशिक मध्यवर्ती कारागृहात अटकेत असलेला भाजपचा नगरसेवक हेमंत शेट्टी अखेर न्यायालयाच्या अनुमतीने दाेन तासांच्या सवलतीवर महासभेच्या कामकाज मुख्य म्हणजे स्वत:ची हजेरी लावण्यासाठी मंगळवारी दुपारी दाखल झाला. महापालिका स्थापनेनंतर प्रथमच महासभेसारख्या सार्वभाैम सभागृहात एखाद्या नगरसेवकाला पाेलिसांच्या देखरेखीखाली कामकाज करण्याची वेळ अाली. सलग सहा महिने कामकाजात नसल्यास नगरसेवकपदावरील गंडांतर टाळण्यासाठी शेट्टी हजर राहिला. मात्र, साेमवारी महासभा कारण नसताना शेट्टीचे पद वाचवण्यासाठी तहकूब केली का, असे तांत्रिक प्रश्न उपस्थित करून विराेधकांनी भाजपची चांगलीच काेंडीही केली.

 

विराेधकांकडून तांत्रिक मुद्यांचे बाण
दरम्यान,शेट्टीवर थेट निशाणा साधता विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, कॉँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी सोमवारी महासभा तहकूब असल्याने मंगळवारी महासभेतील ठरावांना काेणती तारीख देणार, असा तांत्रिक पेच उपस्थित केला. मंगळवारी स्वतंत्र सभा असे जाहीर केले तर सलग सहा महासभा गैरहजरच्या मुद्यावरून शेट्टी याच्या पदावर गंडांतर येऊ शकते, ही अडचण लक्षात घेत विराेधकांनी निशाणा साधला. दरम्यान, सभा तहकूब केलीच नव्हती तर धार्मिकस्थळांबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा पालिका प्रभारी आयुक्तांच्या उपस्थितीसाठी एक दिवस कामकाज पुढे ढकलले, असा युक्तिवाद महापाैरांनी केला. दरम्यान, स्थायीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेते दिनकर पाटील, भाजप गटनेते संभाजी मोरूस्कर यांनी महापौरांची जोरदार पाठराखण केली. दरम्यान, भाजप नगरसेवक जगदीश पाटील यांनी महासभेत सुरुवातीलाच काेर्टाने कामकाजात सहभागी हाेण्यासाठी विशिष्ट मुदत शेट्टी यांना दिल्याने त्यांना प्रभागातील प्रश्नांसंदर्भातील प्रस्ताव मांडण्याची परवानगी मिळण्याची विनंती केली. महापौरांनी ती मान्य केल्यानंतर शेट्टीने विकासकामांविषयक महासभेच्या पटलावरील विषयांना मंजुरी मिळावी, अशी मागणी केली. त्यानंतर पाेलिस बंदाेबस्तात शेट्टी सभागृहाबाहेर निघाले.

बातम्या आणखी आहेत...