आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंट्रल जेलमधील संचित रजेवर गेलेला आरोपी फरार,मुंबईतील खुनाच्या गुन्ह्यातील अाराेपी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या गुुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला कारागृह विभागाने फरार घोषित केले. या आरोपीला दोन वेळा संचित रजा मंजूर झाली होती. मात्र, रजेचा कालावधी पूर्ण होऊनदेखील तो कारागृहात आला नाही. अखेर कारागृह प्रशासनाने त्यास शुक्रवारी फरार घोषित केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर पोलिसांनी हा गुन्हा जम्मू पोलिसांकडे वर्ग केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साजीद अहमद यास मुंबईतील महिला वकिलाच्या हत्येप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ऑगस्ट २०१२ राेजी वडाळा भागात एका फ्लॅटमध्ये साजीदने महिला वकिलाची हत्या केली होती. या इमारतीमध्ये साजीद सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. २०१४ मध्ये साजीदला मुंबई न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

शिक्षा भोगत असताना साजीद संचित रजेवर गेला होता. कारागृह विभागाने त्यास फरार घोषित केले आहे. त्याच्याविरोधात नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. साजीद जम्मूचा राहणारा असल्याने हा गुन्हा जम्मू पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...