आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरानगर पोलिसांच्या हद्दीत ‘गुंडाराज', वडाळागावात कापला तलवारीने केक...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुंडगिरी वाढत असून, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे येथील शांतता भंग झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. अनेक ठिकाणी सुरू असलेले अवैध धंदे पोलिसांच्या वरदहस्तामुळे सर्रास सुरू असल्याने गुंडगिरीला अभय मिळत असल्याचाही आरोप होत आहे. वडाळा गावात एकाने मित्रांसमवेत तलवारीने केक कापल्याचा फोटो सोशल मीडियावर झळकल्यानंतर पोलिसांना जाग आली आणि कारवाई सुरू झाली.

वडाळा गाव या परिसरात तलवारी अशा खुल्या पद्धतीने बाहेर काढल्या जातात. यामुळे पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. एकीकडे कोम्बिंग ऑपरेशन केले जाते, त्यात अशी हत्यारे का सापडत नाहीत, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

अंबड पोलिस ठाण्याचा ताण कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी इंदिरानगर पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे इंदिरानगरवासीयांना शांतता गुन्हेगारीमुक्त परिसराची अपेक्षा होती.

मात्र, पोलिसांच्या वरदहस्तामुळे अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू असून, वडाळा, विनयनगर, भारतनगर, राजीवनगरसह परिसरात प्रचंड गुंडगिरीचा त्रास आहे. चोऱ्या, सोनसाखळी चोरी, आपसातील वाद, रात्रीच्या वेळी दुचाकीधारकांना लुटणे, मोबाइल चोरी, चौकाचौकात उभे राहणारे टवाळखोर, महिला मुलींची छेड, अवैध धंदे सुरू आहेत.