आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Criminals Dance In Panchawati ; Business Men Bored

पंचवटीत गुंडांचा धुमाकूळ ; खंडणीच्या गुन्ह्यांमुळे व्यावसायिक त्रस्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी - गेल्या काही दिवसांपासून पंचवटी परिसरात व्यावसायिकांना धमकावणे, लूटमार आणि खंडणीच्या गुन्ह्यांचे सत्र सुरू असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी एकाच दिवशी तीन गुन्हे घडले. या घटनांमुळे पोलिसांचा वचक काहीसा कमी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

दिंडोरीरोडवरील तरंग बिअर शॉपीमध्ये पाच जणांच्या टोळक्याने कामगारास मारहाण करून लुटल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी शॉपीचे संचालक विजय पवार यांच्या तक्रारीनुसार, संशयित रमेश केतन काळे, सोनू खंदारे, लखन सोनवणे, दौलत गायकवाड, जनार्दन खोडे यांनी कुरापत काढून कामगारास मारहाण केली. या वादात पवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनाही मारहाण करून सोनसाखळी व रोकड असा 50 हजारांचा ऐवज लांबविला.

या घटनेचे वृत्त समजताच उपायुक्त साहेबराव पाटील, वरिष्ठ निरीक्षक बाजीराव भोसले यांनी धाव घेत काही तासांतच संशयितांना अटक केली. दुसर्‍या घटनेत सीमेंट विक्रेते भूषण सुराणा यांच्या म्हसरूळ येथील दुकानात घुसून 12 सीमेंटच्या गोण्या आणि 25 हजार काढून घेत गुंडांनी पोबारा केला. सुराणा यांच्या तक्रारीनुसार, सराईत गुन्हेगार अनिल पवार ऊर्फ अन्या सांड व तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करीत पवार यास अटक केली. दोन्ही गुन्ह्यांतील संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

15 जणांविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव
पंचवटीतील 15 सराईत गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव आयुक्तालयात पाठविण्यात आले आहेत. त्यांच्यावर लवकरच कारवाई होणार असून, आणखी 20 गुन्हेगार रडारवर आहेत. नागरिकांनी न घाबरता गुन्हेगारांची माहिती द्यावी. बाजीराव भोसले, वरिष्ठ निरीक्षक, पंचवटी पोलिस ठाणे