आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘क्राॅम्प्टन’ संपप्रकरणी सुनावणी आता साेमवारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - क्राॅम्प्टन ग्रीव्हजमधील कामगारांच्या संपप्रकरणी गुरुवारी (दि.११) आैद्याेगिक न्यायालयात सुनावणी हाेणार हाेती. मात्र, आता ही सुनावणी दि.१५ जून राेजी हाेणार आहे. दरम्यान, या संपाला महिना उलटून गेला असून, आतापर्यंत कंपनीचे सुमारे १५० काेटींपेक्षा जास्त उत्पादन ठप्प झालेले आहे.

क्राॅम्प्टन ग्रीव्हज कंपनीतील कायदेशीर ‘मान्यताप्राप्त’ ग्रीव्हज काॅटन अॅण्ड अलाइड एम्प्लाॅइज युनियनसाेबत कंपनी व्यवस्थापनाने केलेला वेतन करार मान्य नसल्याने ‘सीटू’शी संलग्न कामगारांनी संप पुकारला आहे. संपावर ताेडगा निघावा याकरिता कामगार उपायुक्त निमाने केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. अंबड पाेलिसांनीही मध्यस्थीचा प्रयत्न केला हाेता. जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणी बैठक घ्यावी, अशी मागणी ‘सीटू’ने केली हाेती. मात्र, अशी बैठक झालीच नाही. त्यामुळे आैद्याेगिक न्यायालयाच्या सुनावणीकडे कामगार, व्यवस्थापनच नव्हे तर उद्याेजकांचेही लक्ष लागले आहे.

क्राॅम्प्टनने संप बेकायदेशीर कसा ठरवला, त्यावर असलेली स्वाक्षरी अधिकृत कशी मानायची, अशी हरकत सीटूतर्फे घेण्यात आल्याने क्राॅम्प्टनच्या संचालक मंडळाने वरिष्ठ महाव्यवस्थापक मुकुल श्रीवास्तव यांना ‘पाॅवर आॅफ अॅटर्नी’ दिल्याचे व्यवस्थापनाने न्यायालयापुढे सांगितले.