आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘क्रॉम्प्टन’मध्ये ४४ दिवसांपासून सुरू असलेला संप आज मिटण्याची चिन्हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अंबड औद्योगिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीतील कामगारांनी पुकारलेल्या संपप्रकरणी कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांच्याकडे मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे गेल्या ४४ दिवसांपासून सुरू असलेला हा दीर्घ संप बुधवारी (दि. २४) मिटण्याची चनि्हे निर्माण झाली आहेत.
बैठकीस संपाचे नेतृत्व करणाऱ्या कामगार प्रतिनिधींसह व्यवस्थापनाचेही प्रतिनिधी उपस्थित होते. आमदार सीमा हिरे यांनी या बैठकीकरिता शिष्टाई केली असून, मुंबईत मंत्रालयात कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या दालनात ही बैठक झाली. बैठकीत कामगार व्यवस्थापनाने एकमेकांबाबत न्यायालयात केलेल्या तक्रारी मागे घ्याव्यात, तसेच ज्या कामगारांची चाैकशी सुरू आहे, ती मागे घेण्यात यावी, अशा काही बाबी दोन्हींकडून सकारात्मकपणे घेतल्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार बुधवारी सकाळी कामगारांशी चर्चा करूनच हा संप मागे घेण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिकच्या औद्योगिक जगतात हा संप कधी मिटताे, याकडे लक्ष लागून आहे. खासदार हेमंत गाेडसे, आमदार सीमा हिरे यांनी याकरिता कामगारांशी यापूर्वीही चर्चा केली होती. उद्याेगमंत्री, मुख्यमंत्र्यांनाही या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन कामगारांनी केले होते. आता हा संप मिटण्याची चनि्हे आहेत. दरम्यान, या प्रकरणी कामगार नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
आश्वासक चर्चेमुळे मार्ग मोकळा...
- आश्वासक चर्चेमुळे संप मिटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कामगार व्यवस्थापन एकमेकांवरील न्यायालयीन खटले मागे घेतील आणि व्यवस्थापन चौकशीची कार्यवाही सुरू असलेल्या २७ कर्मचाऱ्यांबाबत सौम्य भूमिका घेईल, असा निर्णय या बैठकीत झाला आहे. कामगार संप मागे घेऊन कामावर हजर होतील, असे मान्य करण्यात आले असून, त्याकरिता ते बुधवारी इतर कामगारांशीही बैठकीत संवाद साधतील, असे ठरले आहे.
आमदार सीमा हिरे
बातम्या आणखी आहेत...