आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाैथ्या दिवशीही ‘क्राॅम्प्टन’चा संप कायम, ताेडग्याचे प्रयत्न सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - क्राॅम्प्टन ग्रीव्हज कंपनीतील सीटूप्रणीत कामगार युनियनने केलेला संप चाैथ्या दिवशीही कायम हाेता. संपात सहभागी झालेल्या ४० कामगारांना गुरुवारी कंपनीत प्रवेश करता आला, मात्र उत्पादन प्रक्रिया आजही सुरू झाल्याने १५ ते २० काेटी रुपयांचे उत्पादन ठप्प झाले आहे. दरम्यान, दाेन युनियनमधील वादात मध्यस्थी करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून निमाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत काही ताेडगा िनघू शकला नाही.

आैद्याेगिक क्षेत्रातील या एका माेठ्या कंपनीत मान्यताप्राप्त आणि संख्याबहुल युनियन अशा वादाची ठिणगी पडली आहे. गुरुवारीही माेजक्याच कामगारांना कंपनीत प्रवेश मिळू शकला. खासदार हेमंत गाेडसे यांनी संपकरी कामगारांशी चर्चा केली. कामगारांनी संपाच्या १५ दिवस आधीच गोडसे यांना निवेदन देऊन चर्चा केली होती. केंद्र राज्यात भाजप-िशवसेनेची सत्ता असल्याने उद्योगमंत्री, कामगारमंत्री कामगार आयुक्तांशी खासदारांनी चर्चा करून प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केली.

सुमारे २० काेटींचे उत्पादन ठप्प
निमाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सीटूचे नेते डाॅ. कराड गुरुवारी दुपारी निमा हाउसमध्ये चर्चेसाठी गेले. निमाचे अध्यक्ष रवी वर्मा, माजी अध्यक्ष मनीष काेठारी, उपाध्यक्ष संजीव नारंग, आयमाचे माजी अध्यक्ष सुरेश माळी, राजेंद्र अहिरे यांच्याशी चर्चेत निमाने मुद्दा मांडला की, नाशिकमध्ये आतापर्यंत जागा उपलब्ध नव्हती, म्हणून माेठे उद्याेग येऊ शकले नाहीत. पण, आता जागा असून माेठे उद्याेग येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संपासारख्या बाबी त्यावर विपरित परिणाम करतात. दाेन युनियनमधील वाद चर्चेतून साेडवता येईल, मात्र संप मागे घेण्यात यावा. त्यावर डाॅ. कराड यांनी कामगारांचे िनलंबन तत्काळ मागे घ्यावे, चाैकशी थांबवावी, यासाठी यात निमाने मध्यस्थी करावी, असे सांगितले. कंपनी व्यवस्थापनाकडून या बैठकीस काेणीच नव्हते. िनमा कंपनी व्यवस्थापनाशीही चर्चा करणार असल्याचे काेठारी यांनी सांगितले.