आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crore Tax Cuts Should End Issue At Nashik, Divya Marathi

प्रतिभूती मुद्रणालयाची सव्वाकोटी घरपट्टी थकली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एकीकडे सामान्यांकडे घरपट्टी थकली तर मालमत्ता जप्तीची कारवाई करणार्‍या महापालिकेने नाशिकरोड येथील भारतीय प्रतिभूती मुद्रणालयाकडून तब्बल चार वर्षांपासून घरपट्टीच वसूल केली नसल्याची बाब लेखापरीक्षणात उघड झाली आहे. जवळपास एक कोटी 15 लाख रुपये घरपट्टीची थकबाकी असून, आता पालिका काय भूमिका घेते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सन 2011-12 या आर्थिक वर्षातील स्थानिक निधी लेखापरीक्षण अहवालात ही बाब उघडकीस आली असून, पालिकेच्या निष्काळजीपणावरही यात प्रकाश टाकण्यास आला आहे. 1 नोव्हेंबर 2008 पासून भारतीय प्रतिभूती मुद्रणालयाचे रूपांतर मुद्रा निगम लिमिटेड (महामंडळात) यामध्ये झाले. महामंडळात रूपांतर झाल्यामुळे पालिकेने दिलेली घरपट्टी माफीची सवलत रद्द झाली. दोन्ही कारखान्यांच्या इमारती तसेच अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी बांधलेल्या वसाहतींना मुंबई महापालिका अधिनियम 1949 च्या कलम 127 व प्रकरण आठ कराधन नियम कलम 20 प्रमाणे घरपट्टी आकारली जात आहे. त्याप्रमाणे 606 क्वार्टर्स यांचे 17002 चौरस मीटर क्षेत्रासाठी 6 लाख 96 हजार 844, तर 202 क्वार्टर्सच्या 5667 चौरस मीटर क्षेत्रासाठी 2 लाख 32 हजार 272 अशी घरपट्टी आकारणी केली जात होती. दोन्ही मिळून वार्षिक 9 लाख 29 हजार 116 रुपये गृहीत धरले होते. हा रहिवासी दरातील घरपट्टीचा विषय होता.
याव्यतिरिक्त 1399 चौरस मीटरच्या अनिवासी क्षेत्रासाठी 2 लाख 3 हजार 429, निवासी क्षेत्रासाठी 7637 चौरस मीटरच्या 3 लाख 13 हजार 14, तर नवीन सीएनपीच्या 40 हजार 282 चौरस मीटरकरिता 1 लाख 99 हजार 396 इतकी वार्षिक आकारणी करणे अपेक्षित होते. रहिवासी व व्यावसायिक अशा घरपट्टीचा विचार केला, तर वार्षिक 29 लाख 9 हजार 923 रुपये घरपट्टी मिळाली असती. मात्र, सन 2009-10 पासून तर सन 2013 या आर्थिक वर्षात घरपट्टीच भरली नाही. त्यामुळे एक कोटी 16 लाख 39 हजार रुपयांची वसुली करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
निर्णयाकडे लक्ष
महापालिकेच्या घरपट्टी विभागाकडून सामान्यांच्या बाबतीत वसुलीबाबत तत्परता दाखविली जाते. मात्र, आता प्रतिभूती मुद्रणालयाची तब्बल सव्वाकोटीची घरपट्टी थकल्याने याबाबत महापालिका काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.