आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crores Of Rupee Differences In Kumbhamela Planning

कुंभमेळा आराखड्यात कोट्यवधींची तफावत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्यात कार्यान्वित असलेल्या महापालिका, जिल्हा आणि राज्य शासनाच्या प्रस्तावित विकासकामांच्या आराखड्यात सुमारे एक हजार कोटी रुपयांची तफावत आणि गंभीर त्रुटी अाढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

गोदावरी समन्वय समितीचे समन्वयक देवांग जानी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या घोटाळ्याची उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्याची मागणीदेखील देवांग जानी यांनी केली आहे.
जानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहस्थ कुंभमेळा विकास आराखडा मंजूर झालेला आहे. त्यानुसार, सिंहस्थातील विकासकामांसाठी विविध यंत्रणा कार्यान्वित झाल्या आहेत. ‘कुंभमेळा-२०१५ महाराष्ट्र.जीओव्ही.इन’ आणि ‘नाशिक.एनआयसी.इन’, नाशिक महापालिका, नाशिक यांच्या संकेतस्थळांवर या विकास आराखड्याची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. या संकेतस्थळांवरील तीनही आराखड्यांमधील आकडेवारीचे अवलोकन केले असता, त्यात गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्या आहेत.

पंचवटीच्या तपोवनातील साधुग्राम कामासाठी ५२ कोटी यासंबंधी ‘नाशिक.एनआयइसी.इन’ या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे, तर महापालिकेच्या संकेतस्थळावर ८२.७० कोटी रुपयांचा निधी दाखविण्यात आला आहे. यामध्ये तब्बल ३०.७० कोटी रुपयांचा वाढीव फरक दाखवण्यात आला आहे. पूल बांधणीसाठी ‘महाराष्ट्र.जीओव्ही.इन’ या संकेतस्थळावर २४ कोटी रुपये रक्कम दाखवण्यात आली आहे. हीच रक्कम महापालिकेच्या संकेतस्थळावर २.७५ कोटींचा वाढीव निधी म्हणून दाखविण्यात आली आहे.

पाणीपुरवठा व्यवस्थापनामध्ये राज्य शासनाच्या संकेतस्थळावर ९३.२३ कोटी रुपयांचा खर्च, तर महापालिकेच्या संकेतस्थळावर या निधीत ३१.२३ कोटींची वाढ दाखविण्यात आली आहे. वैद्यकीय सेवा, स्वच्छता आणि आरोग्यसेवा, विद्युत व्यवस्था, अग्निशमन आणि आणीबाणी, रस्ते विकास यामध्ये कोट्यवधींचा वाढीव निधी महापालिकेच्या संकेतस्थळावर दाखविण्यात आला आहे.
तिन्ही प्रशासनाच्या संकेतस्थळावरील तफावतीची प्रतीनुसार माहिती देवांग जानी यांनी पत्रकारांना दिली. या तफावतीची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या वेळी मारुती दिघोळे, उमापती ओझा, योगेश रामय्या, चिराग गुप्ता, नितीन शुक्ल, जसबीरसिंग अादी समितीचे सदस्य उपस्थित होते.