आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crores Of Works Shut Down Due To Press Agitation

प्रेसमधील आंदोलनामुळे कोट्यवधींचे कामकाज ठप्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली इंडिया सिक्युरिटी तसेच करन्सी नोट प्रेसमधील कामगारांनी पुकारलेल्या ‘कामबंद’ आंदोलनामुळे दोन्ही प्रेसमध्ये कोट्यवधी रुपयांचे कामकाज ठप्प झाले आहे. कामगारांची झडती घेण्याच्या वादातून झालेल्या लाठीचार्जमुळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे कमांडर रोहित अश्विनकुमार यांच्या बदलीच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. चलन, पासपोर्ट, स्टॅम्प व इतर महत्त्वपूर्ण कागदपत्रांचेही गेल्या 24 तासांपासून उत्पादन ठप्प आहे. कामगार हजर होते.


मात्र, त्यांनी कामाला हात लावला नाही. दिल्ली, मुंबई येथून आलेल्या वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर तोडगा निघण्याची कामगारांना आशा आहे.

कामाचा ताण वाढणार : दोन्ही प्रेसमध्ये कोटा पद्धतीने काम दिले जाते. त्यामुळे कामकाज सुरळीत सुरू झाल्यानंतर कामगारांना नियमित कोट्यासह आंदोलनामुळे उत्पादित होऊ न शकलेल्या कामाचा कोटाही पूर्ण करून द्यावा लागणार आहे.