आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँकेबाहेर रांगा घटल्या, मात्र पाेस्टाबाहेर गर्दीचा महापूर, पाचशेची नाेट नाहीच, एटीएम काही प्रमाणात सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अापलेखाते असलेल्याच बँकात नाेटा बदलून मिळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर बँकांसमाेर दिसणाऱ्या रांगा थेट साठ ते सत्तर टक्क्यांनी घटल्याचे चित्र मंगळवारी शहरात हाेते. तर सर्वच नागरिकांना नाेटा बदली करून घेण्यासाठी पाेस्टाचा एकमेव पर्याय शिल्लक राहील्याने दिवसभर पाेस्टाबाहेर मात्र गर्दीचा महापूर पहायला मिळत हाेता. दरम्यान, मंगळवारी शहरात पाचशे रुपयांची नाेट अालीच नाही तर एटीएम सुरू असल्याचे प्रमाणही निम्म्याच्या अासपास हाेते .
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी नाेव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून एक हजार अाणि पाचशे रुपयांच्या नाेटा रद्द केल्याचे जाहीर केलेल्या उद्या बराेबर पंधरा िदवस पूर्ण हाेत अाहेत. नाेटबंदीच्या निर्णयानंतरच्यापहिल्या अाठवड्यात ज्याप्रकारे शहराच्या विविध भागातील बँका, पाेस्ट कार्यालयासमाेर नाेटा बदली करून घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा पहायला िमळत हाेत्या, तशी गर्दी अाता कुठेच िदसत नाहर. ठप्प असलेली एटीएम सेवाही काही प्रमाणात सुरू हाेत असल्याचे िचत्र अाहे.

स्टेट बँक, बँक अाॅफ महाराष्ट्रसह काही खासगी बँकांची एटीएम सुरू झाली असून अनेक एटीएममधून शंभर तर स्टेट बँकेच्या एटीएममधून दाेन हजार अाणि शंभर रुपयांच्या नाेटा िमळू लागल्या अाहेत. यामुळे बाजारात चलन फिरायला सुरुवात झाली अाहे. अाॅनलाइन बँकिंग, क्रेडिट डेबिट कार्डचाही अाधार ग्राहक व्यावसायिकांकडून घेतला जात अाहे, यामुळे बाजारातील काेंडी फुटत असल्याचे िचत्र अाहे.
पाेस्टासमाेर माेठ्या रांगा
बँकांतखाते असेल तरच नाेटा बदलून िमळत असल्याने नाेटा बदलण्याकरीता नागरिक अाता पाेस्टाकडे वळाले अाहेत. याचा प्रत्यय पाेस्टासमाेर लागलेल्या माेठमाेठ्या रांगांतून पहायला िमळताे अाहे. येथे बाेटाला शाई लावणे सुरू असल्याने दुबार येणाऱ्यांना मज्जाव झाला असला तरी रांगा मात्र वाढल्या अाहेत. पाेस्टाने बुधवारी शहरातील सर्वच कार्यालयांत िमळून ८३ लाख रुपयांचे वाटप केले.

५०० नाेट अद्यापही नाहीच
एटीएममधूनथेट दाेन हजार शंभराच्या नाेटा िमळत अाहेत. यामुळे मात्र नाेटा सांभाळण्याचा त्रास ग्राहकांना जाणवत अाहे तर दाेन हजाराची नाेट घेऊन दाेन-चारशे रुपयांची खरेदी केलेल्यांना माेठ्या प्रमाणावर शंभराच्या नाेटा परत द्याव्या लागत अाहे. पाचशेची नाेट व्यवहारात यावी, अशी मागणी अाता जाेर धरत असून स्टेट बँक अाॅफ इंडिया अाणि बँक अाॅफ महाराष्ट्रने रिझर्व्ह बँकेकडे या नाेटांची मागणी नाेंदविलेली असली तरी मंगळवारपर्यंत शहरात या नाेटा अालेल्या नव्हत्या.

सहकारी बँकांना स्टेट बँकेकडून २१ काेटी २८ लाख
स्टेटबँकेने अात्तापर्यंत सहकारी बँकांना २१ काेटी २८ लाख रुपयांचे वितरण केले अाहे. सहकारी बँकांना जास्त प्रमाणावर नाेटा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जाेर धरत अाहे. िजल्हा बँकेलाही राेख रकमेचा तुटवडा भासत असल्याने त्यांनाही माेठी रक्कम उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी हाेत अाहे.
बातम्या आणखी आहेत...