आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे आरक्षण फुल, स्थानकावर प्रचंड गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - दिवाळीनिमित्तसरकारी कार्यालयांना सलग चार दिवस सुटी असल्याने कर्मचाऱ्यांनी पर्यटनाला पसंती दिली आहे. त्यामुळे गत महिन्यापासून रेल्वेचे आरक्षण फुल असल्याने सध्या प्रवाशांनी तत्काळ प्रणालीतून आरक्षण तिकीट काढण्यासाठी गर्दी हाेत आहे. यामुळे दलालांचीही चांदी होत असून, प्रवाशांची मात्र अार्थिक लूट होत आहे. 
 
नाशिकरोड रेल्वेस्थानकातून उत्तर भारतात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी माेठी असल्याने आरक्षणासाठी रेल्वेस्थानकात गर्दी दिसून येत आहे. परंतु गत महिन्यापासून आरक्षण फुल असल्याने प्रवाशांना विनाआरक्षण घरी परतावे लागत आहे. बहुतांश प्रवाशांची तिकिटासाठी गैरसाेय हाेतानाही दिसत आहे. जवळच्या पल्ल्यांसाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर गर्दी आहे. 
 
बस बंद असल्याने रिक्षांना गर्दी 
एसटी कर्मचाऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशीही बंद असल्यामुळे नाशिकरोड रेल्वेस्थानकाबाहेर प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसेस बंद असल्याने अनेकांना रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. 
बातम्या आणखी आहेत...