आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Culprit Apply For The Anticipatory Bail In Nashik

अटकपूर्व जामिनासाठी भूषण लोंढेचा अर्ज, विवाहानंतर शरण येण्याची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सराईत गुन्हेगारांच्या दुहेरी खून प्रकरणात संशयितांना मदत केल्याप्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या पी. एल. ग्रुपचा म्हाेरक्या नगरसेवकपुत्र भूषण लाेंढे याचा स्वत:चा विवाह तीन दिवसांवर असल्याने त्याने अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली अाहे.

विवाह साेहळ्याची तयारी पूर्ण झाल्याने किमान लग्नापर्यंत पोलिसांनी अटक करू नये, त्यानंतर पाेलिस म्हणतील तेव्हा अापण स्वत:हून त्यास हजर करू, अशा मागणीचे नगरसेवक प्रकाश लाेंढे यांचे प्रतिज्ञापत्रच त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सादर केले. यावर बुधवारी निर्णय हाेण्याची शक्यता अाहे.

अर्जुन आव्हाड, निखिल गवळे (रा. सातपूर) या दोघांच्या हत्या प्रकरणात पी. एल. ग्रुपचा म्होरक्या भूषण लोंढे, संदीप गांगुर्डे यांच्या विरोधात गुन्ह्यात अप्रत्यक्ष सहभाग गुन्हा घडूनही त्याची माहिती दडवल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. साेमवारी रात्री गुन्हा दाखल हेाताच दुसऱ्याच िदवशी अटकपूर्वसाठी अर्ज करण्यात आला. भूषण लोंढे याच्या पी. एल. ग्रुपच्या कार्यालयात दोघा सराईत गुन्हेगारांचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, घटना उघडकीस अाल्यापासून पाेलिसांचा लोंढेवर संशय होता. लाेंढे याच्या वतीने अॅड. राहुल कासलीवाल यांनी न्यायालयात अटकपूर्व अर्ज सादर करीत बाजू मांडली. विवाह साेहळ्याची तयारी पूर्ण झाल्याने त्यास ताेपर्यंत अटक करू नये. त्याचा विवाह हाेताच पाेलिसांच्या अादेशानुसार त्यास तत्काळ हजर केले जाईल. याबाबत त्याचे वडील नगरसेवक लाेंढे यांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात अाले. या गुन्ह्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याचाही दावा करण्यात अाला.

कारवाई सुरू
भूषणचाशुक्रवारी (दि. २२) विवाह असून, त्यापूर्वीच गुन्हे शाखेचा ससेमिरा सुरू झाल्याने लग्नाच्या बेडीपूर्वीच पोलिसांच्या बेड्या हातात पडण्याची शक्यता निर्माण झाली अाहे.