नाशिकरोड - इंडियासिक्युरिटी करन्सी नोट प्रेस कामगारांसाठी अत्याधुनिक सांस्कृतिक हॉल उभारण्याचा निर्णय इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाने घेतला आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यालगत प्रेसच्या स्वमालकीच्या एक एकरात हॉलची उभारणी होणार असून, त्यासाठी अंदाजे ७० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती संघाचे कार्याध्यक्ष जगदीश गोडसे यांनी दिली.
दोन्ही प्रेसमधील कामगारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा हॉल उभारला जाणार आहे. हॉलचा उपयाेग कामगारांना सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याबरोबरच विविध स्पर्धा घेण्यासाठी होईल. सर्व सुविधायुक्त असा हा हॉल असणार आहे. त्यामुळे व्यावसायिक सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देणेही शक्य होणार आहे. प्रेसच्या अनेक कामगारांनी राज्यस्तरावर कलेद्वारे
आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र, सराव सादरीकरणासाठी शहर परिसरात हॉल उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होत. हॉलच्या उभारणीमुळे ती दूर होणार आहे. प्रेसचे महामंडळात रूपांतर होण्यापूर्वी नेहरूनगर गोरेवाडीच्या प्रेसच्या हॉलचा वापर होत होता. गणेशाेत्सवात प्रेसच्या वेल्फेअर कमिटीच्या वतीने सलग दहा दविस विविध व्यावसायिक सांस्कृतिक कार्यक्रम दोन्ही ठिकाणी होतात. नवीन हॉलमुळे एकाच ठिकाणी दोन्ही प्रेसच्या कामगारांना कार्यक्रम बघण्याचा आनंद लुटता येणार आहे. नाशिकमधील कालिदास कलामंदिराच्या धर्तीवर हॉलची उभारणी केली जाणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले.
गंगाजळी वाढली
इंडियासिक्युरिटी प्रेस मजदूर संघाची सत्ता कामगार पॅनलने नऊ वर्षानंतर आपला पॅनलकडून घेतली तेव्हा संघाची बँकेत अवघी साडेतीन लाखांची मुदतठेव शिल्लक होती. कामगार पॅनलने अडीच वर्षात सर्व प्रकारच्या खर्चात बचत करून मुदतठेवीत वाढ करत ४५ लाख रुपयांची शिल्लक ठेवली आहे. मजदूर संघाच्या श्रमिक हॉलची दुरवस्था झाली असल्याने दुरुस्तीचा प्रस्ताव संघाच्या विचाराधीन आहे. या हॉलचा विविध कार्यक्रमांसाठी वापर होऊ शकताे. जगदीशगोडसे, कायार्ध्यक्ष,आयएसपी मजदूर संघ