आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाकवी कालिदासाला सांस्कृतिक अभिवादन, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचेे सांस्कृतिक कार्यक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नृत्य,नाट्य अाणि संगीतातून महाकवी कालिदासाला वंदन करण्यात अाले. कालिदास दिनाच्या निमित्ताने कालिदास कलामंदिरात महानगरपालिका अाणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात अाले हाेते.
महाकवी कालिदास दिनानिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने करण्यात अाले. यावेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम, उपाध्यक्ष शाहू खैरे, कार्यवाह सुनील ढगे, नगरसेवक अनिल मटाले, व्यवस्थापक प्रकाश साळवे, अण्णा झेंडे अादी उपस्थित हाेते. यानंतर कलानंद नृत्य संस्थेच्या विद्यार्थिनींनी कथकद्वारे कालिदासाला नमन केले. त्यांनी प्रारंभी प्रथम सुमर श्रीगणेश सादर केले, तर त्यानंतर मेघाला अाळवणी करताना त्यांनी ‘अाई बारवा की ऋतू अाई’ या गीतावर नृत्यताल धरला. यात वेदश्री सातपुते, श्यामल भाेर, ऋतुजा कांकरिया, संंयुक्ता कपाेते, ऋतुजा चंद्रात्रे, हर्विषा तांबट, साक्षी फुगे, संस्कृती साेनवणे, मुद्रा पटवर्धन, काेमन कानकाटे, श्रावणी मुंगी यांचा सहभाग हाेता. यानंतर संताेष फसाटे यांनी मिमिक्री करून रसिकांचे मनाेरंजन केले. त्यात शरद पवार, फडणवीस, लतादीदी, अण्णा हजारे यांच्यासह काही कलाकारांचा अावाज त्यांनी काढला. त्याला रसिकांनी दाद दिली. तर, दुसऱ्या टप्प्यात नाट्यसेवा संस्थेची निर्मिती असलेली शंतनू चंद्रात्रे लिखित, अानंद जाधव दिग्दर्शित व्हिक्टाेरियस डिफीट ही एकांकिका सादर झाली. यात अाशिष चंद्रचूड, मंजूषा फणसाळकर, स्वप्नील जाेशी, अजय तारगे, दामिनी जाधव, किरण जायभावे, सतीश वराडेे, कृतार्थ कंसारा यांच्या भूमिका हाेत्या. तर, अखेरच्या सत्रात रेशीमझुला हा हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. त्यात राजेंद्र बुरसे, सुरेंद्र बुरसे, प्रमाेद जांभेकर, हेमंत म्हसकर, साैरभ बुरसे, स्नेहल बुरसे, प्राची म्हैसकर यांचा सहभाग हाेता.

नाशिक महानगरपालिका अाणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे महाकवी कालिदास दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कलानंद नृत्य संस्थेच्या विद्यार्थिनींनी कथकद्वारे कालिदासाला नमन केले.

कार्यक्रमाची माहिती पोहोचल्याने रसिकांची पाठ
मुळातच कालिदासदिनी काय कार्यक्रम हाेणार अाहेत, याची माहितीच रसिकांपर्यंत व्यवस्थित पाेहाेचल्याने नेहमीप्रमाणे यंदाही या कार्यक्रमाकडे रसिकांनी पाठ फिरवली. ज्याचे सादरीकरण हाेते त्यांच्या बराेबर अालेले रसिक ते सादरीकरण झाले की निघून जात. नृत्य झाल्यावर विद्यार्थिनींचे पालक निघून गेलेे. नाटकाचेही तेच झाले. त्यामुळे हा कार्यक्रम कशासाठी अाणि काेणासाठी असताे, हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...