आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृतज्ञता: नायटिंगेल कन्यांचा गौरव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिका आणि रुग्णांकडून या ऋणापोटी व्यक्त झालेली कृतज्ञता मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिका महाविद्यालयात दिसून आली.
जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिका महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांच्या हस्ते फ्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण केले. तसेच, रांगोळी, चित्रकला, एकपात्री प्रयोग नाटक अादी कार्यक्रमही झाले. प्रथम विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. महाविद्यालयाच्या शमा माहुलीकर यांच्या विदुषकाच्या वेशभूषेने सर्वांचेच लक्ष वेधले होते.
या वेळी डॉ. जे. एम. होले, अधिसेविका विजया शेजावळे, परिचारिका संघटनेच्या पूजा पवार, कल्पना पवार, शालिनी उदीवाल, शोभा सोनवणे, शोभा दिवे, श्यामा माहुलीकर यांच्यासह परिचारिका संघटनेच्या पदाधिकारी, परिचारिका उपस्थित होत्या. प्रारंभी डॉ. माले यांनी परिचारिकांना शुभेच्छा दिल्या. परिचारिकांविना रुग्णसेवा पूर्ण होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
जागतिक परिचारिका दिनानिमित्त रुग्णांच्या अाराेग्याची काळजी घेत त्यांची अविरत सेवा करणाऱ्या परिचारिकांना मंगळवारी रुग्णांनी गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. जिल्हा रुग्णालयातील अशाच एका प्रसंगात एका ज्येष्ठ रुग्णाने आशीर्वाद देत कृतज्ञता व्यक्त केली.
"शास्त्रीय उपचारांतून अलौकिक कार्य'
रुग्णांना मानसिक आधार देणे, त्यांची सेवा करणे योग्य शास्त्रीय उपचार करणे हे परिचारिकांचे अलौकिक कार्य आहे, असे प्रतिपादन नामको ट्रस्ट हॉस्पिटलचे सचिव शशिकांत पारख यांनी केले.

पेठरोडवरील या हॉस्पिटल नर्सिंग कॉलेजात जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रास्ताविक प्राचार्य नागराज यांनी केले. या वेळी नर्सिंग स्टाफ विद्यार्थिनींना मिठाईचे वाटप करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...