आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टीडीअार’ बदलानंतर कपाटे हाेणार नियमित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विकसकांसह सर्वसामान्य ग्राहकांशी निगडित असलेल्या इमारत क्षेत्रातील कपाट नियमित करण्याचा मुद्दा अाता टीडीअार धाेरणाशी संलग्न झाला अाहे. नऊ मीटर रुंदीखालील रस्त्यावर टीडीअार लागू नसल्यामुळे अशा ठिकाणच्या इमारतीतील कपाटे नियमित करण्यासाठी धाेरण बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागणार अाहेत. यासंदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाकडे महापालिकेचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. दरम्यान, कपाटे नियमित करण्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून एकजुटीने प्रयत्न करण्याची गरजही व्यक्त हाेत अाहे.
महापालिका क्षेत्रात दाेन वर्षांपासून कपाटाचा मुद्दा गाजत अाहे. इमारत क्षेत्रातील ‘अाठ बाय दहा’ या कपाट क्षेत्राच्या नियमितीकरणावरून जवळपास २८०० इमारतींचे पूर्णत्वाचे दाखले थांबले असल्याचे सांगितले जाते. कपाट क्षेत्र अनियमित असल्याचे कारण देत कारवाईचा धाक दाखवला जात असला तरी, मुळात काेणती कारवाई करायची याबाबत स्पष्टताच नाही. प्रीमियम वा दंड अाकारून कपाटे नियमित हाेतील, असेही सांगितले गेले. त्यासाठी विकसकांनीही तयारी दाखवली. प्रत्यक्षात, त्या दृष्टीने काेणतेही प्रयत्न झाले नाही.
मध्यंतरी, विकसकांनी अामदारांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यावर त्यांनी कपाटाचा मुद्दा निकाली काढण्याची तयारी दाखवली हाेती. मात्र, त्याबाबत पुढे काही झाले नाही. कपाटाचा प्रश्न केवळ विकसकांबराेबरच नाही तर घर खरेदी करणाऱ्या सामान्य ग्राहकांशी इमारतीला पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर त्यांच्याकडून मिळणाऱ्या लाखाे रुपयांच्या विकासशुल्काद्वारे पालिकेच्या उत्पन्नाशीही जाेडला गेला अाहे. त्यामुळे परस्परांवर अवलंबून असलेल्यात ितन्ही घटकांचा विचार करता कपाट नियमितीकरणासाठी अायुक्तांनी तयारी सुरू केली अाहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी कपाटाशी संबंधित नेमकी प्रकरणे किती याची वर्गवारी निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पालिका सकारात्मक काम करीत असताना अाता टीडीअार धाेरणाचा मुद्दा समाेर अाला अाहे. नवीन टीडीअार धाेरणात नऊ मीटर रुंदीखालील रस्त्यांवरील इमारतींना टीडीअार अनुज्ञेय नाही. प्रत्यक्षात, कपाटाशी संबंधित बहुतांश इमारती नऊ मीटरखालील रस्त्यावर असल्यामुळे अशा परिस्थितीत उद्या कपाटे नियमित करण्यासाठी टीडीअार देणार काेठून, असा प्रश्न अाहे. या पार्श्वभूमीवर अाता महापालिका बांधकाम विकसक या दाेघांनी त्यांच्या-त्यांच्या पातळीवर राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली अाहे. पालिकेने यापूर्वीच ही अडचण नगरविकास विभागाच्या लक्षात अाणून दिली अाहे.
खत प्रकल्पावरून ठाकरेंचा दणका
महापालिकेतमनसेची सत्ता असून शहरातील बांधकाम परवानगी सुरळीत करण्याच्या दृष्टीने खत प्रकल्प सुरू करण्याचा ठेका देण्याची बाब अत्यंत महत्त्वाची अाहे. खत प्रकल्प सुरू झाला तर, राष्ट्रीय हरित लवादाकडे बांधकाम परवानगीवरील निर्बंध उठवण्यासाठी पालिकेला विनंती करता येणार अाहे. प्रत्यक्षात मात्र, स्थायी समितीने संबंधित प्रस्ताव अभ्यासासाठी तहकूब केल्यामुळे प्रशासन गडबडून गेले हाेते. दरम्यान, हा प्रस्ताव मंजूर करणे किती गरजेचे अाहे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कानावर अायुक्तांनी घातल्यावर त्यांनी स्थायी समिती सभापती सलीम शेख यांना तातडीने प्रस्ताव मंजूर करण्याचे अादेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यावरून अाता खत प्रकल्पासाठी स्थायी समितीची लवकरच बैठकही हाेण्याची शक्यता अाहे.
बातम्या आणखी आहेत...