आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संचारबंदी असूनही दगडफेक, जाळपोळ; ४० पोलिस जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - हरसूल येथे मंगळवारी झालेल्या दंगल प्रकरणात पोलिसांनी निरपराध नागरिकांना ताब्यात घेतल्याने हरसूल परिसरातील नागरिकांनी संचारबंदी असूनही बुधवारी पुन्हा जाेरदार दगडफेक दुकानांची जाळपोळ केली. सुमारे अर्धातास सुरू असलेल्या या धुमश्चक्रीत ४० पोलिस जखमी झाले. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. येथे शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी भेट देणारे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच काही तरुणांनी ट्रक पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तैनात बंदोबस्तामुळे गावाला जणू छावणीचे स्वरूप आले आहे. तर, तणाव कमी होण्याची शक्यता नसल्याचे जाणवताच अनेक ग्रामस्थांनी घरे सोडल्याने गाव ओस पडले आहे.

भगीरथ चौधरी या तरुणाच्या मृत्यूची चौकशी करावी, या मागणीसाठी निघालेल्या मोर्चानंतर मंगळवारी हरसूलमध्ये दंगल उसळली होती. या प्रकरणी पोलिसांनी काही नागरिकांना
हरसूलमध्ये मंगळवारी उसळलेल्या दंगलीची तीव्रता बुधवारीही कायमच होती. सलग दुसऱ्या दिवशीही हल्लेखोरांनी ट्रकची जाळपोळ, दगडफेक केली. तशाही स्थितीत गावातील परिस्थिती जाणून घेताना पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह पोलिस अधिकारी.

आतापर्यंत ६७ पोलिस कर्मचारी जखमी
हरसूलपरिसरात झालेल्या दंगलीमध्ये दोन दिवसांत सुमारे ६७ पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी सुमारे २७, तर बुधवारीही सुमारे ४० पोलिस जखमी झाले आहेत.

पोलिस उपअधीक्षकांचे पिस्तूल गायब
पोलिसउपअधीक्षक प्रवीण मुंडे हे दंगलीत जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. या दंगलीदरम्यान त्यांचे पिस्तूल हरविल्याचेही सांगण्यात आले. त्याला अधिकृत सूत्रांनी दुजोरा मात्र दिला नाही.

अफवांवर विश्वास ठेवू नका...
दंगली भडकवण्याच्या उद्देशाने अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. परिस्थिती नियंत्रणात आहे. - संजयमोहिते, पोलिस अधीक्षक
बातम्या आणखी आहेत...