आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएमच्या अपडेट्सअभावी अॅप्स ठरताहेत कुचकामी, नोटा टंचाईनंतर शेकडो अॅप्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पाचशे अाणि हजार रुपयांच्या नाेटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर झाल्यावर खळबळ उडाली खरी; परंतु त्यातून बाहेर निघण्यासाठी काही कंपन्यांनी माेबाइल अॅप्लिकेशनचा फंडा पुढे अाणला अाहे. गुगल प्ले स्टाेअरला भेट दिल्यास नाेटा अाणि संबंधित निर्णयाशी संबंधित असंख्य अॅप्लिकेशन विकसित केल्याचे दिसून येते. मात्र, नाशिकमध्ये असे अॅप्लिकेशनचे वापरकर्ते कमी असल्याने त्याची उपयुक्तता मात्र सध्यातरी सिद्ध हाेत नसल्याचे निदर्शनास येत अाहे.
जुन्या नाेटा बंद केल्यानंतर पैसे काढण्यासाठी जवळपास प्रत्येक एटीएमवर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या दिसतात. त्यात माेठा कालापव्यय हाेताे. त्यातही अनेक एटीएममध्ये पैसेच शिल्लक नसल्याने ग्राहकाला पैसे असलेल्या एटीएमच्या शाेधात फिरावे लागत अाहे. हा ‘फेरफटका’ टाळण्यासाठी काही अॅप्लिकेशन माेबाइलच्या दुनियेत लाँच झाले अाहेत. यात ज्या एटीएममध्ये पैसे अाहेत त्यांची माहिती दिली जाते. मनी व्ह्यूव, फाइंड एटीएम विथ कॅश, एटीएम फाइंडर, एटीएम कॅश निअरबाय, एटीएम कॅश स्टेटस, एटीएम लाइव्ह, एटीएम कॅश, नाे कॅश फाइंडर, एटीएम विथ कॅश, मेरा एटीएम अादी अॅपव्दारे ही माहिती दिली जाते. अर्थात अॅप्लिकेशन्स तयार करताना त्यावर केवळ एटीएमची माहिती, स्थळ अादी बाबी देण्यात अाल्या अाहेत. संबंधित एटीएममध्ये पैसे अाहेत की नाही, याची माहिती ग्राहकांनीच अपडेट करायची असते. बंगळुरूसारख्या टेक्नाेसॅव्ही शहरांमध्ये अशा अॅप्लिकेशनला जाेरदार प्रतिसाद मिळत अाहेत. तेथील नागरिक पैसे काढून झाल्यानंतर तातडीने काेठे पैसे उपलब्ध अाहेत याचे अपडेट अॅपवर देतात.

नाशिकमध्ये मात्र असे अपडेट टाकलेच जात नसल्याने हे अॅप कुचकामी ठरत अाहेत. या संबंधितच्या अॅपचा धांडाेळा घेतला असता चक्क दाेन ते तीन अाठवड्यांनी एखादा ग्राहक ताजी माहिती टाकत असल्याचे दिसते. त्यामुळे या अॅपवर विश्वास ठेवून कुणी एटीएममध्ये पैसे काढण्यास गेल्यास त्याला रिकाम्या हातीही परत यावे लागण्याची शक्यता असते.

वास्तव माहिती कमी, काैतुकच झाले फार
अॅप्लिकेशनची विश्वासार्हता तसेच दर्जा लक्षात येण्यासाठी ग्राहकांना ‘रिव्ह्यू’चा पर्याय खुला असताे. यात अॅप कसे अाहे, याची वास्तव माहिती द्यायची असते. जेणेकरून अन्य ग्राहकांना ते वाचून संबंधित अॅपचा वापर करावा की नाही, याचे मार्गदर्शन हाेते. प्रत्यक्षात चलनासंदर्भातील अॅपवर संबंधित अॅपची माहिती कमी अाणि माेदींचा निर्णय कसा याेग्य अाहे याविषयीच्याच ‘कमेंट’ अधिक दिसतात.
बातम्या आणखी आहेत...