आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस एजन्सी करताहेत सवलतीचे सिलिंडर हडप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ब्लॉक केलेले गॅस कनेक्शन केवायसी अर्ज भरल्यानंतर तीन दिवसांत सुरू करणे अनिवार्य असताना गॅस कंपन्या आणि एजन्सीकडून पंधरा दिवसांचा कालावधी यासाठी लागेल अशी उत्तरे ग्राहकांना देण्यात येत आहे. यामागे ग्राहकांचे सवलतीच्या दराचे सिंलिंडर हडपण्याचाच प्रयत्न एजन्सी आणि गॅस कंपन्यांकडून केला जात असल्याचा ग्राहकांचा आक्षेप आहे.

केवायसी अर्ज न भरल्यामुळे गॅस कनेक्शनच कंपनीने ब्लॉक केले आहे. कंपनीकडून त्याची माहीतीही सिलिंडर रिफिल करण्यासाठी गेल्यानंतरच ग्राहकांना दिली जात आहे. मात्र हा अर्ज पुर्ण भरल्यानंतर साधारणत: तीन दिवसांच्या दरम्यान सिलिंडर देण्याचे दंडक असतानाही ते दिले जात नाही. पंधरा दिवसांनी सिलिंडर देण्याची उत्तरे एजन्सीकडू दिली जात आहे. तसे झाल्यास बहुतांशी ग्राहकांना एप्रिल महिन्यातच सिलिंडर मिळेल. त्याची नोंदणी पुढील आर्थिक वर्षात केली जाईल. त्यामुळे ग्राहकाला चालू आर्थिक वर्षातील त्यांच्या हक्काच्या एका सबसिडीच्या सिलिंडरला मुकावे लागणार आहे. हा ग्राहकांवर अन्याय असून गॅस कंपन्यांकडून जाणीवपूर्वक ही कोंडी केली जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.


आधी सांगितले केवायसी नको
केवायसी अर्ज भरण्याच्या सुरुवातीलाच कंपनी आणि एजन्सीने एक कनेक्शन असलेल्यांनी अर्ज भरण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. मात्र, मार्च अखेरीस कंपनीने ग्राहकांची फसवणूक करत थेट त्यांचे कनेक्शन ब्लॉक करून आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न सुरू केला.


वितरणाची तारीखच ग्राह्य धरली जाणार
सिलिंडर मार्च मध्ये किंवा केव्हाही नोंदविले तरीही त्याचे वितरण जेव्हा केले जाईल, तीच तारीख ग्राह्य धरली जाणार असे वितरकांकडून सांगण्यात आले. अनेक ग्राहकांनी मार्चअखेर सिंलिंडरची नोंदणी केली आहे.


सिलिंडर विक्री अधिक दराने शक्य
नाशिकमध्ये 34 गॅस एजन्सी असून त्यांच्याकडील एकूण ग्राहक संख्या 2 लाख 38 हजारावर जाते. एवढे कनेक्शन ब्लॉक केले. यातील निम्मे म्हणेज एक लाख 19 हजार ग्राहकांचे एक सबसिडीचे सिलिंडर एप्रिलमध्ये दिले जाईल. कंपनी हे सिलिंडर अधिक दराने विकण्याची शक्यता आहे.

.तरच कनेक्शन ब्लॉक होईल


दोन कनेक्शन एकच व्यक्तीच्या नावे असेल अशाच ग्राहकांनी केवायसी फॉर्म भरुन द्यायचे आहेत. ते न भरल्यास कनेक्शन ब्लॉक केले जाईल. लक्ष्मण मंडाले, गॅस वितरक संघटना जिल्हाध्यक्ष

माझे कनेक्शनही एकच आहे आणि पत्ताही बदलेला नाही. तसेच यापुर्वी मी हा अर्ज भरुन दिला तरीही कनेक्शन ब्लॉक केले. अण्णासाहेब पवार, ग्राहक

गॅस कंनेक्शन कंपनीने ब्लॉक केले. आमच्याकडे आठ हजार कनेक्शन ब्लॉक झाले. ग्राहकांकहून अर्ज भरुन कंपनीस पाठवितो. त्यानंतर कनेक्शन दोन-तीन दिवसांत पूर्ववत होते. मात्र, ग्राहकांचा तगादा नको म्हणून 15 दिवसांनी येण्याचे सांगितले जात आहे. रोहित वैशंपायन , वैशंपायन एजन्सीचे मालक