आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुहेरी हत्याकांडातील संशयितांना २२ अाॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- येथील रोकडोबावाडीतील दुहेरी हत्याकांडातील दहा संशयितांना न्यायालयाने २२ अाॅगस्टपर्यंत चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली अाहे.

नाशिकराेड पाेलिसांनी याप्रकरणी प्रथम अाठ संशयितांना ताब्यात घेतले हाेते. त्यापैकी एक अल्पवयीन अाहे. या सर्वांना नाशिकराेड न्यायालयासमाेर हजर केले असता १८ अाॅगस्टपर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात अाली हाेती. अाठ संशयितांची काेठडी संपल्याने अाणखी दाेघा संशयितांना ताब्यात घेतल्याने १० संशयितांना गुरुवारी (दि. १८) नाशिकराेड न्यायालयात हजर करण्यात अाले हाेते. यावेळी न्यायालयाने त्यांना २२ अाॅगस्टपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली अाहे. संशयितांना पाहण्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने खबरदारी म्हणून पाेलिसांनी त्यांना न्यायालया बाहेर काढले.

रोकडोबावाडीतील गुलाब करीम शेख, अकबर अन्वर शेख यांची हत्या आणि संदीप रघुनाथ जैन याला मारहाण करण्यात आली होती. उपनगर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दीड दिवसात संशयितांना ताब्यात घेत हत्याकांडाचे गूढ उकलले. यातील संशयित आतिष कैलास निकम, नितीन निवृत्ती बनकर, प्रशांत नाना जाधव, आकाश नामदेव खताळे, अमोल अंबादास पठाडे, गोविंदा शंकर इंगोले, विशाल पगारे आणि एका अल्पवयीन युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तीन दिवसांनी रोकडोबावाडीतील अमजद इब्राहिम शेख आणि विहितगाव येथील अाझाद मजिर शेख यांना ताब्यात घेतले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, पोलिसपुत्र, बंधूकडे सापडले चाकू
बातम्या आणखी आहेत...