आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cut Down Trees News In Marathi, 25 Trees Cutting Issue At Nashik, Divya Marathi

आडगाव परिसरात तोडले 25 वृक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आडगाव परिसरातील शरयू पार्क येथे एका बांधकाम व्यावसायिकाने वृक्षतोड केल्याचा प्रकार उघडकीस आला. मोकळ्या भूखंडातील सुमारे 25 झाडे तोडण्यात आल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले. वृक्ष प्राधिकरण विभागात व आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील शरयू पार्क येथे दिलीप लभडे यांचा मोकळा भूखंड आहे. येथील बांधकाम व्यावसायिक आणि मालकामध्ये वाद झाल्याने या भूखंडावरील ही झाडे तोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित व्यावसायिकाने वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी घेतली असल्याचे सांगत वृक्ष तोडले असल्याचे सांगितले. नगरसेविका मीनाताई माळोदे व बालाजी माळोदे यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रार केली आहे.
वृक्ष प्राधिकरण विभागात आर्थिक व्यवहार करून झाडे तोडण्याचे आदेश मिळवले असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला. याबाबत वृक्ष प्राधिकरण विभागाच्या अधिकार्‍यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे मीनाताई माळोदे यांनी सांगितले. आडगाव पोलिस ठाण्यात व्यावसायिकाच्या विरोधात अर्ज करण्यात आला असून, पोलिस कारवाई होण्याची शक्यता आहे.
उद्यान विभागाकडे विचारणा करणार
वृक्ष तोडीबाबत उद्यान विभागाच्या अधिकार्‍यांना विचारणा केली जाईल. वृक्ष तोडीबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोषींवर कडक कारवाईसाठी प्रयत्न करणार. मीनाताई माळोदे, नगरसेविका प्रभाग 1