आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाेकादायक वृक्ष ताेडण्यास अटींवर परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील रस्त्यांवरील धाेकेदायक वृक्षांना हटविण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली असून, वृक्षप्रेमी संघटनांचे अाक्षेप पूर्ण करावे, पर्यायी वृक्ष लागवड करून त्यांचे समाधान झाल्यानंतरच पुढील कारवाई करावी, असाही निर्णय झाला. अतिरिक्त अायुक्त अनिल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काेर्टाने वृक्षताेडीला अटीशर्तींवर परवानगी दिली असून, त्याचे पालन करण्याच्या सूचना सदस्यांनी केल्या. उद्यान विभागाच्या १९० कर्मचाऱ्यांना एकाच विभागात पाठवून त्यांच्याकडून उद्यानाची सफाई केली जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या माेहिमेस ११ जानेवारीस प्रारंभ हाेणार अाहे. यापूर्वी साडेसात काेटींचा ठेका उद्यान देखभालीसाठी दिला हाेता. मात्र, त्यासंदर्भातील अटी महिला बचतगटांसाठी पाेषक नसल्याने बदलण्याची कारवाई सुरू अाहे. दरम्यान, वृक्ष प्राधिकरण समितीची सदस्यसंख्या १६ असताना त्यांना डावलून काही नगरसेवकांची बैठक घेण्याची बाब बेकायदेशीर असल्याचा अाराेप संदीप भवर यांनी केला.