आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर क्राइमवर सतर्कता हाच उपाय’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दिवसेंदिवस वाढता संगणक व इंटरनेटचा वापर आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ ही अतिशय चिंताजनक बाब असून, या गुन्ह्यांना शहरातील तरुणांबरोबरच प्रौढ व्यक्तीदेखील कळत-नकळत बळी पडत आहेत. आपण सायबर गुन्ह्यांचे लक्ष्य होऊ नये, म्हणून अधिकाधिक सतर्कता बाळगणे हाच यावरील मुख्य उपाय असल्याचे मत एलाइट सोशल अँड वेल्फेअर सोसायटीचे सदस्य तथा संगणक तज्ज्ञ शोहेब पटेल यांनी केले.

जुन्या नाशिकमधील रहेबर-ए-तालीम संस्था संचलित रहेनुमा प्राथामिक व माध्यमिक शाळेत आयोजित ‘सायबर क्राइमचा धोका‘ या विषयांवर मार्गदर्शन शिबिरात पटेल हे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर रहेबर-ए-तालीम संस्थेचे अध्यक्ष विकार पीरजादा, नगरसेवक सुफी जीन, नगरसेविका समिना मेमन, मुख्याध्यापिका शिरीन सय्यद, रुबिना शेख, एलाइट सोशल अँड वेल्फेअर सोसायटीचे वसीम शेख, जाहीद शेख, हाजी शोहेब मेमन आदी उपस्थित होते.

पटेल म्हणाले की, सायबर गुन्ह्यांत माहितीची चोरी, इ-मेलच्या माध्यमातून अपशब्द पाठवणे, माहितीचा अवैध वापर, माहितीत सहेतूक फेरफार, ठरवलेली सेवा देण्यास नकार असे अनेक प्रकार आहेत. तसेच मोबाइल नेटसारख्या क्राइम व इंटरनेट बँकिंग यासारख्या गुन्ह्याचे प्रकार भारतात सर्वाधिक आहे. तसेच काही लोक सायबर सुरक्षेविषयी फारसे जागरूक नाहीत केवळ इंटरनेट असेल, तरच गुन्हे घडू शकतात. हा समजदेखील चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मोबाइलवर व्हॉट्स-अँप आणि फेसबुकवर कोणताही असा मजकूर किंवा फोटो पोस्ट करू नये,ज्यांनी समाजात तेढ निर्माण होईल हादेखील सायबर क्राइमच असल्याचे या वेळी विकार पीरजादा यांनी केले.