नाशिक - गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेचे तीन युनिट कार्यान्वित आहेत. मात्र, आर्थिक आणि सायबर क्राइमचे गुन्हे तपासण्यासाठी स्वतंत्र पथक नसल्याने या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी गुन्हे शाखेचे चाैथे युनिट कार्यान्वित केले आहे.
शहर पोलिस आयुक्तालयात परिमंडळ मधील पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा, आडगाव, गंगापूर, म्हसरूळ, मुंबई नाका आणि नाशिकरोड, उपनगर, अंबड, सातपूर, इंदिरानगर, देवळाली कॅम्प असे १३ पोलिस ठाणे कार्यान्वित आहेत. यास गुन्हे शाखेचे तीन युनिट कार्यान्वित आहेत. पोलिस ठाण्याच्या हद्दीत सायबर क्राइम, आर्थिक फसवणुकीचे आणि सोशल मीडियाचे गुन्हे वाढत आहेत. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा आणि तंत्रविश्लेषण शाखेकडून केला जातो. या गुन्ह्यांचा वाढती संख्या लक्षात घेता पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी गुन्हे शाखेचे चाैथे युनिट कार्यान्वित केले आहे. या युनिटचा पदभार वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. या युनिटकडून १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या सर्व सायबर गुन्ह्यांचा तपास केला जाणार आहे. गुन्हे शाखेच्या १, या युनिटवरील पडणारा अतिरिक्त तपास कामांचा ताण यामुळे हलका होणार आहे. चाैथे युनिट वाढल्याने तपासाला गती मिळणार आहे. गुन्हे उघडकीस येण्याच्या प्रमाणातही वाढ होणार आहे.
तंत्रविश्लेषण शाखेचे स्वतंत्र युनिट
^पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार चाैथे युनिट कार्यान्वित करण्यात आले आहे. सायबर क्राइम आणि सोशल मीडियावर घडणारे गुन्हे या युनिटकडून तपासण्यात येणार आहेत. - अनिल पवार, वरिष्ठनिरीक्षक, गुन्हे शाखा युनिट