नाशिक- सायकलींगमध्ये अनेक जण साहसही दाखवत असतात. असेच साहस नाशिकमधील काही डॉक्टर, वकिलांनी केले. जगातील सर्वात उंच वाहतूक मार्गावर सायकल सफर त्यांनी केली. नाशिककरांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. यातील काही रोमांचक आणि चित्तथरारक अनुभव अॅड. वैभव शेटे यांनी 'दिव्य मराठी' कडे शेअर केले.
डॉ. ललेश नाहटा, डॉ. नीलेश निकम, डॉ. संदीप मोरे, नाशिक आणि डॉ. अजय मुंडे, डॉ. ज्ञानेश्वर घुगे, श्रीकांत फड, नागपूर येथील डॉ. रवि वाईकर, डॉ. रमय्या निसाळ, राजश्री व हैदराबाद येथील शिवानी गुरुवारा आणि मी असे ११ सायकलिस्ट या सफरमध्ये सहभागी झालो. या सफरीचे आयोजन मनाली येथील खेमराज ठाकूर यांनी केले होते. मुंबई येथून विमानाने चंदीगड, तेथून कारने मनाली येथे पोहोचलो. हा रस्ता घाटाचा आणि पूर्णत: खराब आहे. हाच रस्ता सायकलसाठी कसा ठरेल याची चिंता वाटत होती. १० दिवस कराव्या लागणा-या सायकल सफरचा तपशील हाती आला. मुक्काम, येणारी गावे, उंच गेल्यावर लागणारी यंत्रणा, ९ कर्मचाऱ्यांचा ताफा होता. सायकल सफरचा पहिला दिवस मनाली येथून सुरुवात झाली. ४० कि.मी. चढाई केल्यानंतर मढी येथे पहिला टप्पा यशस्वी संपला. येथे पोहचताच पावसाने जोरदार स्वागत केले. दाट धुके, ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता. रात्री ३ ते ४ डिग्री तपमान. दुसरा दिवस मढी रोहतांग पास खोकसर-गोंडला-सिसू असे पास करावयाचे होते. रोहतांग हा सफरीतला पहिला पास सुमारे १३५०० फूट उंचावर येथे २० फुटावर बर्फ असते. हा रस्ता पुढील सहा महिने बंद असतो. तिसरा दिवस- ५५ किमीचा प्रवास सिसु-तंडी-दार-केलॉग-जिस्पा असा होता. रस्ता अत्यंत खडतर, एका बाजूला नदी दुसऱ्या बाजूला मातीचा डोंगर येथे चंद्र व भागा नद्यांचा संगम होतो. पुढे केलॉग गाव घाट चढून खाली उतरल्यावर थोडी चढाई केल्यास जिस्पा गावामध्ये मुक्काम केला. चौथा दिवस- जिस्प-दादरा-पटेसो- झिंगझिंगबार ४५ किमीचा प्रवास करत पाचव्या दिवशी बार्लोचा-लापास-केलुंगसराईत-सारचु-ब्रँण्डीनाला ७० कि.मी.चा प्रवास पूर्ण केला. या दरम्यान बरेच जण शारिरीक, मानसिकदृष्ट्या खचले होते. अकरा पैकी चौघे पुढे निघालो. सहाव्या दिवशी ६० किमीचा प्रवास करत नकिलापास- व्हिस्कीनाला- लाचुंगलापास- पांग येथून सकाळी ६ वाजता प्रवास परत चौघांचा प्रवास सुरू झाला. गाटालुप्सीचे नागमोडी वळण घेत नकिलापास गाठला. हा सुमारे १५३४७ फूट इतका उंच होता. येथे हिमवर्षावाला सामोरे जावे लागले. ९ किमीपर्यंत हिमवर्षाव होता. या घाटाची चढाई करत १६६०० फूट उंचावर पोहचलो. चौघा सदस्यांनी माघर घेतल्याने तिघे पुढच्या सफरला निघालो. २५ चे ३० किमी अंतर पार केल्यानंतर पांग येथे मुक्काम केला. सातव्या दिवसापर्यंत प्रवास सोपा होता. पांगपासून ८ किमीचा घाट चढून मोरे प्लेन्स डेबरिंगच्या अलीकडे सोकर लेक लद्दाखमधील तीन प्रसिद्ध स्थळांपैकी सोकरलेक एक आठव्या दिवशी ७५ किमी अंतर पार करावयाचे होते. सोकरलेक-टांगटांगला पास- समशे- लाटो- असा प्रवास येथे सॅटेलाईट फोनची सुविधी होती. याठिकाणी स्नो लेपर्ड पाहिल्याचे कळाले. रात्र घाबरूनच काढली. लोटे-उपशी-कारू -िटकसे- लेह असा प्रवास होता. येथे
मोबाइल रेंज मिळाल्याने घरच्यांशी संवाद साधता आला. अखेरचा टप्पा खार्दुंगला गाठावयाचा होता. ३६ किमीचा हा प्रवास असल्याने सकाळी ६ वाजताच सफर सुरू करावी लागणार होती. अत्यंत खडतर, खराब रस्ते पार करून चार तासांच्या सायकलींग प्रवासानंतर खारदुंगला पास गाठला. येथे या धाडसी सफरचा शेवट झाला. गाडीने मनाली लेह ते मुंबई विमान प्रवास करून घरी पोहोचलो.