आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेसाठीची पायपीट सायकलमुळे थांबणार, ‘रोटरी’मुळे अादिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दुर्गम अादिवासी पाड्यातील डाेंगरांतून वाट काढत मजल दरमजल करत कधी ऊन, तर कधी पावसाचा सामना करून पायपीट करत शाळेत पाेहाेचण्यासाठी झटणाऱ्या अादिवासी विद्यार्थ्यांचा प्रवास सुखद करण्याचा प्रयत्न राेटरी क्लब अाॅफ नाशिकने केला अाहे. राेटरी क्लबने रविवारी त्रिंगलवाडीजवळच्या डाेरयाची वाडी येथे एक कार्यक्रम घेऊन पन्नासवर सायकली या विद्यार्थ्यांना भेट दिल्या. तेव्हा या मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य त्यांच्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही देणारे दिसत हाेते.
राेटरीकडून त्रिंगलवाडी हे गाव दत्तक घेण्यात अाले असून, येथील अादिवासींचे जीवनमान उंचावे, यासाठी विविध उपक्रम अातापर्यंत राबविण्यात अाले अाहेत. सायकलवाटप हा त्यापैकीच एक उपक्रम होता. त्रिंगलवाडी परिसरात बळ्याची वाडी, हिरूची वाडी, डाेरयाची वाडी, पत्र्याची वाडी असे छाेटे पाडे अाहेत. येथील विद्यार्थ्यांना वी ते १० वीपर्यंतच्या शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे अनेक मुले शाळा साेडतात, तर मुली सातवीच्या पुढे शक्यताे शाळेत जाणे टाळतात, असे राेटरीच्या लक्षात अाले. त्यानंतर या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्याच्या उद्देशाने त्यांना सायकल भेट देण्याचे रोटरीने ठरविले. याच उपक्रमाच्या अनुषंगाने ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाचा एक शो घेण्यात अाला त्यातून पन्नास हजार रुपयांचा निधी जमविला गेला. शहरवासीयांच्या सायकल दान करण्याबाबत केलेल्या अावाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला पन्नासवर सायकली जमा झाल्या. त्यात पंधरा हजार रुपयांपर्यंतच्याही लहान-माेठ्या प्रकारातील सायकली हाेत्या. त्यांचे वाटप रविवारी त्रिंगलवाडीत कार्यक्रमात करण्यात अाले. विद्यार्थिनींना माेठ्या प्रमाणावर सायकली भेट दिल्या गेल्या. परिसरातील लहान मुलांना शाळेची गोडी लागण्यासाठी लहान सायकली अंगणवाड्यांना देण्यात आल्या. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा प्लँट-२ चे सीएसअार हेड रामकुमार, राेटरी क्लब अाॅफ नाशिकचे अध्यक्ष विवेक जायखेडकर, ग्रुप कॅप्टन विनायक देवधर, अायसीअायसीअायचे क्षेत्रीय व्यवस्थापक सुधीर जाेशी, विजय दिनानी, ऊर्मी दिनानी, समीर जामखेडकर, अाश्विन अलई, सतीश माेरे, राजेश तलरेजा, अनिल सुकेणकर अादी उपस्थित हाेते.

ट्यूबलेस टायर्स
आदिवासीपाड्यातील खडतर रस्त्यांमुळे सायकल पंक्चर होण्याची शक्यता पाहून रोटरीने वाटप केलेल्या ५० वर सायकलींना ट्यूबलेस टायर्स तसेच त्यांना लॉकही बसवून दिले आहेत. त्यासाठी एका चित्रपटाच्या शाेमधून मिळालेला निधी खर्च करण्यात आला.

शंभरावर सायकलींचे उद्दिष्ट
सायकल मिळालेल्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य होते. पण, ज्यांना त्या मिळाल्या नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. शहरवासीयांनी या उपक्रमासाठी पुढे यावे अापल्याकडील जुन्या, नव्या सायकली राेटरीकडे दान कराव्यात. शंभरावर सायकलींचे अामचे उद्दिष्ट अाहे. - विवेक जायखेडकर, अध्यक्ष,राेटरी क्लब अाॅफ नाशिक