आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककर सायकलप्रेमींची दिल्ली ते मुंबई सायकल यात्रा साेमवारपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ हा उपक्रम संपूर्ण देशात राबविला गेला. या निमित्ताने नागरिकांनी देशात स्वच्छता मोहीम राबविली. या उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्त नाशिकच्या सायकलप्रेमींनी दिल्लीतील इंडिया गेट ते मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया अशी १६५० किलोमीटरची सायकल यात्रा आयोजित केली अाहे. ३० नाेव्हेंबर राेजी या सायकल यात्रेस नवी दिल्ली येथील इंडिया गेट येथून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रारंभ हाेईल.
दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यातून जात या सायकल यात्रेचा समाराेप १३ डिसेंबर रोजी मुंबईत गेट-वे ऑफ इंडिया येथे होणार असल्याची माहिती सायकलिस्ट डॉ. राजेश पाटील यांनी दिली. मागील वर्षी १३ नोहेंबर ते २२ नोहेंबर २०१४ रोजी ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ या जनजागृतीसाठी नाशिक ते पणजी गोवा अशी यात्रा केली होती. त्याच प्रेरणेने ही यात्रा यशस्वी होईल, असा विश्वास सायकलप्रेमींनी व्यक्त केला आहे. या यात्रेत अॅड. दिलीप राठी, डॉ. राजेश पाटील, अॅड. वैभव शेटे, तुकाराम नवले, राजेंद्र फड, विलास वाळके यांचा सहभाग राहणार आहे. या यात्रेचे समन्वयक भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव डॉ. अमोल पाटील हे असून, डॉ. वैभव महाले, कॅप्टन नीलेश गायकवाड, प्रीतम पगार, रुचित सणान्से, मितेश सोमवंशी यांचे सहकार्य लाभले आहे. या संपूर्ण प्रवासात ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’, ‘पर्यावरण रक्षण, सुंदर भारत’ याबाबत जनजागृती करण्यासाठी ३० हजार पत्रके वाटणार आहेत.

नाशिकसायकल सिटी व्हावी :या वेळी या सर्व सायकलप्रेमींनी पर्यावरण रक्षणासाठी नाशिक स्मार्ट सिटीसोबत नाशिक सायकल सिटी व्हावी, असे मत बोलून दाखविले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्रोस अमेरिका पूर्ण करणारे डॉ. महेंद्र महाजन डॉ. हितेंद्र महाजन यांचा गौरव केला, त्यावेळी नाशिकबद्दल अभिमान वाटत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे संपूर्ण देशाला नाशिकची वेगळी ओळख होण्यासाठी नाशिक सायकल सिटी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

महाजन बंधूंचा सहभाग
या यात्रेत नाशिककर सायकलप्रेमी ‘अक्रोस अमेरिका’ ही सायकल रेस पूर्ण करणारे डॉ. महेंद्र डॉ. हितेंद्र महाजन या बंधूद्वयांचा सहभाग अाहे. साठवर्षीय अॅड. दिलीप राठी यांचाही यातील सहभाग उल्लेखनीय असून, ते स्वत: पूर्ण प्रवासात सायकल चालवित युवकांना सायकल चालविण्यासाठी प्रेरित करणार आहेत.