आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक ‘सायकलिस्ट’ अध्यक्षांचे सायकलिंग करतानाच निधन!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिर्दी (३८) यांचे शनिवारी सकाळी सायकलिंग करताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. नाशिक रँडोनर्स मायलर्स (एनअारएम) या सायकलिंगच्या उपक्रमांतर्गत नाशिक-मुंबई महामार्गावर पाथर्डी फाट्याजवळ त्यांना हृदयविकाराचा झटका आला.  रविवारी सायंकाळी ५ वाजता त्यांच्यावर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार अाहेत.
 
शनिवारी सकाळी ६ वाजता गंगापूर नाक्यावरून ‘एनअारएम’ सुरू झाल्यानंतर जसपालसिंग अन्य सायकलपटूंसमवेत गप्पा मारत सायकलने १५ ते २० मिनिटांत हाॅटेल एक्स्प्रेस इनच्या पुढे पाेहाेचले. त्याच वेळी त्यांना हार्टअटॅक अाला. ते काेसळले. सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना तत्काळ रॅलीसमवेत असलेल्या व्हॅनमध्ये ठेवले. हदयाला पंप करण्यासह शक्य ते सर्व उपचार करत जसपालसिंग यांना वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
 
बातम्या आणखी आहेत...