आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डी. फार्मसी प्रवेशास २२ जुलैपासून प्रारंभ, आॅप्शन फाॅर्म भरण्याची विद्यार्थ्यांना संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे डिप्लोमा इन फार्मसी (डी. फार्मसी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेचा पहिला टप्पा झाल्यानंतर आता २२ जुलैपासून गुणवत्ता यादीतील वदि्यार्थ्यांना ऑनलाइन ऑप्शन फाॅर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. पदवी अभ्यासक्रमातील थेट द्वितीय वर्ष प्रवेशप्रक्रियेचेही वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

डी. फार्मसीच्या नाशिक विभागातील २७०० जागांसाठी सहा हजार वदि्यार्थ्यांचे अर्ज आले होते. डी. फार्मसी अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आता २२ जुलैपासून ऑप्शन फार्म भरता येतील. कॅप राउंड एक दोन यानुसार प्रवेशप्रक्रिया होतील. त्यानंतर समुपदेशन फेरीचे प्रवेश दिले जातील. तर डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या वदि्यार्थ्यांना बी. फार्मसी या पदवी अभ्यासक्रमासाठीच्या थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देता येईल..

थेट द्वितीय वर्ष प्रवेश
- २१ते ३० जुलै ऑनलाइन ऑप्शन फॉर्म भरणे
- ३१ जुलैपर्यंत कागदपत्रांची तपासणी करणे
- १ ऑगस्ट मेरिट लिस्ट जाहीर
- ३ ते ऑगस्ट अर्जांतील दुरुस्ती
- ५ ऑगस्ट अंतिम गुणवत्ता यादी

डिप्लोमा प्रवेशप्रक्रिया
- २२ते २४ जुलै ऑनलाइन ऑप्शन फॉर्म भरणे
- २७ जुलै कॅप राउंड एकची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हाेणार जाहीर
- २८ ते ३१ प्रवेश नोंदणी करणे
- ४ ते ऑगस्ट कॅप राउंड दुसरा
- ७ ऑगस्ट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर हाेणार
- ८ ते ११ ऑगस्ट प्रवेश नोंदणी करणे
- १९ ते २० कॅप राउंड तिसरा (समुपदेशन फेरी)
- १९ ते २४ प्रवेश निश्चित करणे
बातम्या आणखी आहेत...