आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डी. फार्मसीला जुलैपर्यंत प्रवेशअर्ज करण्याची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इंजिनिअरिंगफार्मसी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे आता फार्मसी पदविका (डी. फार्मसी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीच्या विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना डी. फार्मसी प्रवेशासाठी पात्र राहण्याची संधी असून येत्या जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करण्याची संधी आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली आहे. डी. फार्मसीच्या प्रवेशासाठीचे वेळापत्रक उशिरा जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. अभियांत्रिकी पदवी तसेच बी. फार्मसी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी डी. फार्मसी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची संधी राहणार आहे. फार्मसी पदविका महाविद्यालयात एफसी (फॅसिलिटेशन सेंटर) सुरू झाले असून, विद्यार्थ्यांना नोंदणी करणे अनिवार्य राहील. २८ जून ते जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करण्याची संधी असेल.
त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया होईल. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरणे अनिवार्य असल्याने अर्ज करण्याचे आवाहन पंचवटी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. भांबर यांनी केले आहे.

विभागात २७०० हून अधिक जागा
डी.फार्मसी अभ्यासक्रमाची नाशिक विभागात ४४ हून अधिक महाविद्यालये असून त्यात २८०० जागा उपलब्ध आहेत. नाशिकमध्ये १२ कॉलेजांत ७०५, अहमदनगरमध्ये १० महाविद्यालयांत ६००, जळगावमध्ये १० महाविद्यालयांत ५८५ तर धुळे जिल्ह्यात महाविद्यालयांत ४८० आणि नंदुरबारमध्ये महाविद्यालयांत ३६० अशा एकूण ४४ महाविद्यालयांत २७०० हून अधिक जागा उपलब्ध असल्याची माहिती एशियन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डी. के. पाटील यांनी दिली.

अशी होईल ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया
२८ जून ते जुलै एफसी सेंटरवर ऑनलाइन नोंदणी करणे
२८ ते १० जुलै कागदपत्रांची तपासणी करणे निश्चित करणे
१२ जुलै तात्पुरती मेरिट लिस्ट जाहीर होणार
१२ ते १४ जुलै दुरुस्ती करण्याची संधी असेल
१५ जुलै अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल
बातम्या आणखी आहेत...