आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेकाटे, हिरेंना झटका; भाजप जिल्हाध्यक्षपदी दादाजी जाधव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘पार्टीविथ डिफरन्स’ अशी अाेळख असलेल्या भारतीय जनता पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची कमान देवळा तालुक्यातील तिसगावसारख्या तळाच्या भागातील दादाजी जाधव या संघटनेसाेबत अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्याकडे गुरुवारी सोपविली. त्यामुळे निष्ठावंताला लाॅटरी, तर अायारामांना कसा धक्का दिला जाऊ शकताे, याचे उदाहरणच पक्षाने यातून घालून दिले. अामदार अपूर्व हिरे यांनी बंधू अद्वैय, तर अाक्रमक नेते म्हणून अाेळखले जाणारे माजी अामदार माणिकराव काेकाटे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीनंतर भाजपतील ज्येष्ठ नेत्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्याची बाब चर्चेचा विषय ठरली. दरम्यान, काेकाटे यांनीही राेखठाेक बाेल सुनावून जुना-नवीन वाद निर्माण केला तर नुकसान पक्षाचेच हाेईल, अामच्यासारख्यांचे नाही, असाही प्रतिटाेला लगावला.

गेल्या काही दिवसांपासून भाजप जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक चर्चेचा विषय ठरली हाेती. यापूर्वी फारसे महत्त्व नसलेल्या या निवडणुकीला केंद्र राज्यातील सत्तेमुळे चांगलेच महत्त्व प्राप्त झाले हाेते. म्हणूनच की काय या पदासाठी काेकाटे, हिरे, जाधव यांच्याबराेबर िजल्हा परिषदेचे कृषी सभापती केदा अाहेर, माजी अामदार वसंत गिते, शंकर वाघ, सचिन पाटील यांच्यासह अनेकांमध्ये रस्सीखेच सुरू हाेती. जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यक्षेत्रात येणारे दहा तालुके खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याशी संबंधित असल्यामुळे त्यांची पसंती ज्याला ताे अंतिम, असेही बाेलले जात हाेते.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळपासूनच नाट्यमय घडामाेडींना वेग अाला हाेता. माणिकराव काेकाटे यांचे नाव मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष खुद्द चव्हाण यांच्याकडून अाल्याच्या चर्चेमुळे त्यांची निवड निश्चित मानली जात हाेती. दुसरीकडे अपूर्व हिरे यांनी अद्वैय यांच्यासाठी जाेरदार फिल्डिंग लावल्यामुळे उभयतांमध्ये खेचाखेची सुरू झाली. त्यात चांदवड-देवळ्याचे अामदार राहुल अाहेर यांनीही बंधू केदा यांच्यासाठी प्रयत्न सुरू केल्यामुळे निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली हाेती. पक्षाचे काेअर कमिटी सदस्य, तालुकाध्यक्षांशी चर्चा करून निवडणूक घेण्यापेक्षा एकमताने निवड करण्याची खेळी खेळली गेली. त्यात पुन्हा काेकाटे हिरे या दाेघांमध्ये स्पर्धा झाल्यावर फारसे वादात चर्चेत नसलेल्या, परंतु संघटनेशी अनेक वर्षांपासून संबंधित असलेल्या दादाजी यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घालण्यात अाली.

काेण अाहेत दादाजी
दादाजींनी विद्यार्थिदशेपासून संघ भाजपशी एकनिष्ठपणे काम केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यापासून संघ भाजपच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदे भूषवण्याचा फारसा अनुभव नसून, यापूर्वी एकही जबाबदारी वा पद स्वत:हून मागितले नसल्याचा दावा त्यांनी केला.

जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा
पक्षाने पद नव्हे तर जबाबदारी दिली असे मानून काम करणार. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वांना विचारात घेऊन कामकाज करेल. - दादाजी जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजप
बातम्या आणखी आहेत...