आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपिकांचा ‘थर’थराट... नाशिकरोडला मुंबईच्या महिला पथकाने फोडली दहीहंडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - गोविंदारे गोपाळा... अरे बोल बजरंगी की जय... आता माझी सटकली... चांदी की डाल... अशा नव्या जुन्या गीतांवर ठेका धरून मुंबई येथील मुलींनी पाच थर लावून नाशिकरोड येथील दहीहंडी फोडली. स्थानिक महिला आणि पुरुषांनीही या उत्सवाचा आनंद घेतला.

राजन बच्चुमल दलवाणी मित्र परिवारातर्फे नाशिकरोडला शिखरेवाडी मैदान आणि जेलरोड येथील संत ज्ञानेश्वरनगर येथील मैदानात दहीहंडी उत्सव झाला. मुंबई येथील गोरखनाथ मंडळातील मुलींनी प्रथम मानाची सलामी देत नंतर दहीहंडी फोडण्यासाठी डीजेच्या ठेक्यावर नृत्य करीत चांगलीच रंगत आणली. प्रथम दहीहंडीची उंची जास्त असल्याने ती कमी करण्यात आली. त्यानंतर पाचव्या थरापर्यंत या मंडळाने हंडी फोडली. या वेळी या महिला गोविंदा पथकाला नागरिक टाळ्या वाजून प्रतिसाद देत होते.
मैदानात गर्दी झाल्याने नागरिकांनी परिसरातील इमारतीच्या गच्चीवरून उत्सवाचा आनंद घेतला. या वेळी आमदार बबनराव घोलप, नगरसेविका सविता दलवाणी, राजन दलवाणी, सचिन हांडगे, बाळासाहेब गाडगीळ, नितीन चिडे, बाबा बच्छाव आदी उपस्थित होते.