आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उड्डाणपुलाखालील भाजीबाजार कायम करा’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- सावरकर उड्डाणपुलाखालील भाजीबाजार कायम करून तिथे बसण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी विक्रेत्यांनी गुरुवारी सकाळी मनपा कार्यालयावर मोर्चा काढला. बी. डी. भालेकर मैदानावरून मोर्चा सुरू झाला.

डॉ. आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून राजीव गांधी भवनावर मोर्चाने धडक मारली. आयुक्त संजय खंदारे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिनेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पप्पू जगताप, चंद्रकांत रावत, आकाश वाघ, संतोष वाघमारे, पंचाक्षरी हिरेमठ, सागर मोरे, विनोद मोरे यांच्यासह उड्डाणपुलाखालील विक्रेते मोर्चात सहभागी झाले होते.

टप्प्याटप्प्याने कारवाई
जुना सायखेडा रस्त्यावरील बाजार स्थलांतरित झाला असून जेलरोड, उड्डाणपुलाखाली बाजार टप्प्याटप्प्याने स्थलांतरित केला जाईल. सोयी-सुविधा पुरवल्यानंतर कारवाई सुरू होईल. अधिकारी, अतिक्रमण विभाग

.अन्यथा उपोषण
उड्डाणपुलाखाली जागा अतिक्रमणमुक्त असल्याने बाजार कायम करण्यात अडचण नाही. जागा उपलब्ध न झाल्यास विक्रेते उपोषण करतील.
-दिनेश जाधव, विक्रेता