आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dainik Divyamarathi Junior Editor, Goes To Sujay Form Nashik

नाशिकचा सुजय ठरला 'ज्युनिअर एडिटर', महाराष्ट्रातील चार विद्यार्थी यशस्वी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक येथील सुजय मंगेश परदेशी हा ‘दैनिक भास्कर’चा ‘ज्युनिअर एडिटर’ ठरला आहे. त्याचा मंगळवारी ‘दैनिक दिव्य मराठी’तर्फे सन्मानचिन्ह, बक्षीस आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

‘दैनिक भास्कर समूहा’तर्फे विद्यार्थ्यांची बौद्धिक वाढ होण्यासाठी संपूर्ण देशभरात ‘ज्युनिअर एडिटर’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये देशभरातून सुमारे तीन लाख 12 हजार विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. नाशिक शहरातील 1700 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांमधून आडगाव येथील सुजय मंगेश परदेशी हा उत्तीर्ण झाला आहे. सुजय परदेशी हा नवजीवन पब्लिक स्कूल या शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे. भविष्यात इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहणारा सुजय कराटे, चित्रकला, एमएससीआयटीमध्येही प्रथम वर्गात उत्तीर्ण झाला आहे. सत्काराप्रसंगी वितरण व्यवस्थापक जितेंद्र निकम, उपव्यवस्थापक संजय जोरे, उपव्यवस्थापक पवन हजारे, मुकुंद बैरागी, संजय परदेशी उपस्थित होते.

निकालावर विश्वासच बसत नव्हता
‘दैनिक भास्कर’ने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांना प्रथम धन्यवाद! अशा उपक्रमांमुळे मुलांना अभ्यासाविषयी गोडी निर्माण होते. ज्यावेळी सुजय या स्पर्धेत उत्तीर्ण झाला, असा निकाल लागला त्यावर विश्वासच बसत नव्हता.
-नयना मंगेश परदेशी, सुजयची आई