आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डेअरी प्रॉडक्ट कंपनीविरोधात अपहाराचा गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दामदुप्पट माेबदल्याचे अामिष दाखवून फसवणुकीबाबत अपहाराचे गुन्हे दाखल होण्याची मालिका शहरात सुरूच अाहे. बुधवारी (दि. ५) सायंकाळी नवी दिल्ली येथील एचबीएन डेअरी अँड अलाइड कंपनीविरोधात दीड लाखाच्या अपहारप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि विकास भालचंद्र दोडके (रा. जुने सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित हरमिंदरसिंग श्राण, अंजीतकौर तारासिंग श्राण, अमरदीपसिंग हरमिंदरसिंग श्राण, जसबीर कौर (रा. दिल्ली आणि पंजाब), कंपनीच्या एजंट कल्पना दिघे (रा. आडगाव शिवार) यांनी एचबीएन डेअरी अँड अलाइड लिमिटेड नवीदिल्ली या कंपनीत सहा वर्षे आणि तीन महिने प्रतिमाह २४०, ३२० आणि ८०० रुपये गंुतवणूक केल्यास अनुक्रमे दामदुप्पट २७ हजार, ३६ हजार अाणि ९० हजार रुपये देण्याचे अामिष दाखवले. त्याप्रमाणे वेळोवेळी या कंपनीच्या शिवाजीनगर, पुणेरोड येथील कार्यालयात ९२ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, मोबदला म्हणून एक लाख ५३ हजार रुपयांचा परतावा दिला नाही. कंपनीवर सेबीने गुंतवणूक करण्यास निर्बंध लावले असूनही कंपनीच्या संचालकांनी भरघाेस माेबदल्याचे अामिष दाखवत फसवणूक केल्याची तक्रार पोलिस आयुक्तांकडे केली होती. त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पन्हाळे यांच्याकडे तक्रार अर्ज देण्याच्या सूचना दिल्या. अर्ज आणि दोडके यांच्या जबाबानुसार उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अार्थिक गुन्ह्यांसाठी स्वतंत्र पथक
कमीगुंतवणुकीतजास्त परताव्याचे अामिष दाख‌वत कंपनीने फसवणूक केली आहे. सेबीने निर्बंध घातले असताना गुंतवणूकदारांकडून रकमा घेतल्या. फडणवीस, एचओआय आणि एचबीएन या कंपन्यांच्या अपहाराचे गुन्हे तपासासाठी स्वतंत्र पथक निर्माण करण्यात आले आहे. -विजय पन्हाळे, वरिष्ठ निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा
बातम्या आणखी आहेत...